पुणे : प्रधानमंत्री पीक विमा सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना १४ ऑगस्ट आणि कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रेय गावसाने यांनी दिली.
चालू खरीप हंगामामध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांत राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. तांत्रिक व्यत्ययामुळे शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना स्वतः
अथवा बँक विमा कंपनीने नियुक्त केलेले प्रतिनिधी, ‘क्रॉप इन्शुरन्स ॲप’ आणि सेवा केंद्र यांच्या माध्यमातून योजनेत सहभागी होता येणार असल्याची माहितीही गावसाने यांनी दिली.