मॉडेल तरुणीसमोर भररस्त्यात केले अश्लिल कृत्य, १४ लाख पॅकेज असलेल्या मॅनेजरला अटक
Tv9 Marathi August 12, 2025 10:45 AM

दिल्ली जवळील गुरुग्रामच्या राजीव चौकात जयपुर येथील एका मॉडेलला पाहात दिवसाढवळ्या हस्तमैथून करणाऱ्या एका इसमाचा व्हिडीओ संबंधित मॉडेलने सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर एका वृत्तसेवेने ही बातमी लावून धरत या इसमावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही तपासुन सहा दिवसांनी या आरोपीस अटक करण्यास यश मिळवले आहे. या इसम एका मुलाचा बाप असून उच्चशिक्षित असल्याचे उघडकीस आले आहे.

५ ऑगस्ट रोजी गुरुग्राम पोलिसांच्या पाहण्यात हा व्हिडीओ आला. एका महिलेने धाडस करीत हा व्हिडीओ शूट करुन पोस्ट केला होता. ही महिला मॉडेल असून जयपूरहून बसने गुरुग्रामला आली होती. राजीव चौकात टॅक्सीची ती वाट पाहात असताना मास्क घातलेला हा इसम तिला रोखून पाहू लागला, आणि त्याने भररस्त्यात पोटावर सॅक ठेवून हस्तमैथून सुरु केले. या मॉडेल तरुणीने त्याचा व्हिडीओ मोबाईलने चित्रित केला आणि पोस्ट केला. पोलिस निरीक्षक कृष्ण यांच्या नेतृत्वाखाली एक टीमची स्थापना केली गेली.

अभिलाष कुमार मुलाच्या पॅरेंट मिटींगला गेला होता…

आरोपीला पकडण्यासाठी राजीव चौकातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यानंतर या इसमाची चालण्याची ढब आणि गुप्त माहितीच्या आधारे अखेर ३२ वर्षांच्या अभिलाष कुमार याला अखेर अटक झाली. सोमवारी गुरुग्राम सेक्टर-४९ मधून आरोपीला अटक केली गेली. हा आरोपी एमटेक असून कर्नाल येथील बहादूर चंद कॉलनीत रहाणारा आहे. सध्या तो गुरुग्राम सेक्टर -११ मध्ये भाड्याने राहात होता. पोलिसात तपासात तो लग्न झालेला असून त्याला एक मुलगा देखील आहे. गुरुग्रामच्या सेक्टर -४९ मधील एका खाजगी कंपनी तो असिस्टंट मॅनेजर म्हणून कामाला आहे.

त्या दिवशी काय झाले ?

आश्चर्य म्हणजे एवढा शिकलेला आणि १४ लाखाचे पॅकेज असलेल्या या इसमाने इतकी किळसवाणे काम केले. २ ऑगस्ट रोजी आरोपी अभिलाष कुमार याच्या मुलाच्या पॅरेन्ट्स मिटींगला गेला होता. तेथून परतताना राजीव चौकात तो थांबला होता. त्याचवेळी एक मॉडेल बसमधून उतरली. मॉडेल टॅक्सीची वाट पाहात उभी असताना त्यावेळी तिच्या शेजारी उभे राहून या इसमाने तिला निरखून पाहण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी त्याने तिच्याकडे पाहून हस्तमैथून केले. त्याचवेळी या मॉडेलने तिच्या मोबाईलमधून त्याचे हे घाणेरडे कृत्यू चित्रित करीत व्हायरल केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.