Healthy Shravan fasting breakfast ideas: श्रावण महिना इतर सर्व महिन्यांपैकी पवित्र महिना मानला जातो. या महिन्यातील उपवासात हलके, पचायला सोपे आणि स्वादिष्ट पदार्थ बनवण्याचा सर्वांचाच प्रयत्न असतो. अशावेळी ‘साबुदाणा-राजगिरा चीला’ ही एक झटपट, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी खास तुमच्यासाठीच.
साहित्यशेंगदाण्यांचा कूट – ४ टेबलस्पून
साबुदाणा – १.५ कप
काळी मिरी पूड – १/२ टीस्पून
चवीनुसार सेंधव मीठ
जिरेपूड – १/२ टीस्पून
राजगिरा पीठ – ४ टेबलस्पून
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
किसलेले आले – १ टीस्पून
उकडलेले बटाटे – २
ताजे दही – ४ टेबलस्पून
बारीक चिरलेली कोथिंबीर
पाणी – ३.५ कप
सर्वप्रथम १ कप राजगिरा आणि दीड कप साबुदाणा एकत्र घेऊन बारीक पीठ तयार करा. या पिठात अर्धा चमचा काळी मिरी पूड, चवीनुसार सेंधव मीठ, अर्धा चमचा जिरेपूड, चार मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक चमचा किसलेले आले, २ उकडलेले व किसलेले बटाटे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. चार चमचे दही टाकून थोडे-थोडे पाणी घालत घट्टसर पीठ मळा.
पीठ तयार झाल्यावर ते पाच मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर तवा किंवा पॅन हलकासा तूपाने ग्रीज करा आणि पीठाचा पातळसर थर पसरवा. झाकण लावून एक मिनिट शिजवा, नंतर वरून थोडे तूप लावून पलटा आणि दुसरी बाजू सोनेरी होईपर्यंत शिजवा.
हा गरमागरम ‘साबुदाणा-राजगिरा चीला’ नारळाची चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा. श्रावणातील उपवासात हा पदार्थ तुम्हाला ऊर्जा, चव आणि पोटभर समाधान देईल.