वडूज : गुरसाळे (ता. खटाव) येथील श्री सोमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. निमसोड जिल्हा परिषद गटातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा व मंत्री गोरे यांचा नागरी सत्कार, विविध विकासकामांचे भूमिपूजन लोकार्पण करण्यात आले.
Success Story: 'सातारच्या सोहम घोलपला गुगलमध्ये ४० लाखांचे पॅकेज'; कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी, संभाषणात्मक एआय सल्लागारपदी निवडत्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अंकुश गोरे, धैर्यशील कदम, युवा नेते विक्रमशील कदम, प्रा. बंडा गोडसे, रेश्मा बनसोडे, अनिल माळी, हरिभाऊ जगदाळे, सोमनाथ भोसले, विशाल बागल, धनंजय चव्हाण, रामभाऊ पाटील, शशिकांत मोरे, संजय शितोळे, डॉ. विवेक देशमुख, भरत जाधव, जयसिंगराव जाधव, डॉ. बाळासाहेब झेंडे आदी उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, ‘‘विकासकामांमुळे गावच्या पायाभूत आणि आध्यात्मिक सुविधांमध्ये चांगला विकास होण्यास मदत होणार आहे. आगामी काळात देखील अशा विविध विकासकामांच्या माध्यमातून या भागातील गावांचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू. पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना ताकद देऊ.’’
MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणीयावेळी रासपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, डॉ. किरण जाधव, माजी उपसरपंच प्रताप जाधव, सरपंच हसन शिकलगार, उपसरपंच सागर झेंडे, सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव पाटोळे, उपाध्यक्ष संगीता डोईफोडे, ग्रामपंचायतीचे सदस्य, विकास सोसायटीचे संचालक, शितोळेनगर येथील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी अजितराव देशमुख, अक्षय थोरवे, नीलेश जाधव, अमोल मोरे, हरिभाऊ बनसोडे, संतोष पाटील, सुमीत सुतार आदी उपस्थित होते.