डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ्स इंडियावरील नितेश राणे: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 50 टक्के टॅरिफ लादलं असल्याचे सांगितलं जातंय. परिणामी याचा फटका आता भारतीय बाजारपेठेवर देखील उमटताना दिसतोय. दरम्यान, अमेरिकेनं लावलेल्या शुल्कामुळं देशातील कोळंबी निर्यात (Shrimp export ) उद्योग गंभीर संकटात सापडला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी लादलेल्या शुल्काच्या पार्श्वभूमीवर सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEAI) ने या उद्योगासाठी सरकारकडून आपत्कालीन आर्थिक मदत मागितली आहे.
दुसरीकडे याच मुद्द्यावरून राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भारतीय मत्स्य उत्पादकांसह नागरिकांना सल्ला देत आवाहन केलं आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत भारतीयांनी कोळंबी खाण्याचे प्रमाण वाढवावे, असे आवाहन त्यांनी केलंय.
अमेरिकेनं लावलेल्या शुल्कामुळं देशातील कोळंबी निर्यात (Shrimp export ) उद्योग गंभीर संकटात सापडला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काच्या पार्श्वभूमीवर सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEAI) ने या उद्योगासाठी सरकारकडून आपत्कालीन आर्थिक मदत मागितली आहे. दुसरीकडे या भरमसाठ आयातशुल्कचा फटका भारतीय मत्स्य उत्पादनाला बसला आहे. अशा वेळी भारतीय मत्स्य उत्पादकांनी रडत न बसता भारतात पर्यायी बाजारपेठ शोधावी. तसेच भारतीयांनीही कोळंबी खाण्याचे प्रमाण वाढवावे, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्रालयातील पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले कि, भारतातून होणाऱ्या मासे निर्यातीवर 16 टक्के कर होता. तो ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे 60 टक्के इतका झाला आहे. भारतातून कोळंबी निर्यातीचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे भारताला नवीन बाजारपेठांचा शोध घेणे हा एकमेव मार्ग आहे, परंतु त्यासाठी वेळ लागेल. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष घालत असून ते यातून मार्ग काढत आहे. पण तोपर्यंत मासे उत्पादकांनी रडत बसू नये. त्यांना ही मोठी संधी आहे. असा सल्ला मंत्री नितेश राणे यांनी दिला.
सुमारे 2 अब्ज डॉलर्सच्या कोळंबीच्या निर्यातीत (Shrimp export) व्यत्यय आला आहे, अमेरिकेने प्रतिशोधात्मक शुल्क 25 टक्क्यांवरुन 50 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. भारताने 2024 मध्ये अमेरिकेला 2.8 अब्ज डॉलर्स किमतीचे कोळंबी निर्यात केले आणि या वर्षी आतापर्यंत 500 दशलक्ष डॉलर्सची निर्यात केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा