Share Market: शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची सपाट सुरुवात झाली. ५० अंकांनी सेन्सेक्स वधारला तर निफ्टीही ३१.८५ अंकांनी वाढला. सेन्सेक्स ७९,९२९ अंकांवर आहे तर निफ्टी २४,३९५.१५ अंकांवर आहे. प्री ओपनिंगमध्ये बाजारात वाढ दिसून आली. सेन्सेक्स १३४.२१ अंकांनी तर निफ्टी १५.८० अंकांनी वाढला. गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी शुक्रवारी बाजार कोसळला होता. ४ महिन्यांनी शेअर बाजार ८० हजारांच्या खाली आला होता. शुक्रवारी सेन्सेक्स ७६५ अंकांनी घसरून ७९,८५७ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टीही २४६ अंकांनी घसरून २४ हजार ३५० अंकांवर बंद झाला होता.
दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात सुरुवातीलाच चढ-उतार दिसून आले. बाजार उघडताच शेअर बाजारात सपाट सुरुवात दिसली. त्यानंतर थोडी घसरण झाली पण काही वेळातच निर्देशांकात वाढ झाल्याचं दिसून आलं. सकाळी साडे नऊच्या सुमारास सेन्सेक्स २०० अंकांच्या वाढीसह ८०,०५० वर होता तर निफ्टीही ५० अंकांनी वाढलाय.
सेन्सेक्समध्ये एसबीआय, एनटीपीसी, ट्रेंटच्या शेअर्समध्ये तेजी आहे. तर आयसीआयसीय बँक, एशियन पेंट्स आणि बजाज फिनसर्वच्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण झालीय. निफ्टीमध्ये पीएसयू बँकिंग सेक्टरमध्ये सर्वाधिक तेजी आहे. ऑटो, मेटल, रियल्टी आणि फार्मा सेक्टरमध्येही शेअर्स तेजीत दिसतायत. तर आयटी, एफएमसीजी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये घसरण झालीय.
Rail One OTT: आता तिकीट बुकिंग अॅपमध्ये चित्रपट आणि सिरीज मोफत पाहू शकाल, खास फीचर सुरू, कसं काम करणार?जागतिक बाजारात अस्थिरतेचा धोका कमी होण्याचे संकेत दिसून येत आहेत. सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या सोन्यातली गुंतवणूकही कमी होत आहे. यामुळे सोमवारी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. आता शेअर बाजाराचं लक्ष अमेरिकेच्या महागाईच्या आकड्यांवर असणार आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शुक्रवार २३ जुलै रोजी सोन्यानं दराचा उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतर पुन्हा घसरण झाली. वायदे बाजारातही सोन्याची किंमत कमी झाली आहे.