बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारणारा सलमान खऱ्या आयुष्यात मात्र ‘फॅमिली मॅन’ म्हणजेच कौटुंबिक व्यक्ती आहे. आई, बाबा, भाऊ, बहीण, भाऊ-बहिणींची मुलं.. या सर्वांना तो खूप जपतो. त्यांच्या सुखदु:खाच्या काळात पाठिशी खंबीरपणे उभा राहतो. त्याचवेळी भाऊबहिणींच्या मुलांसोबत त्याचं एक अनोखं नातं पहायला मिळतं. आपल्या कुटुंबीयांप्रती सलमान किती सजग आहे, याचं उदाहरण नुकतंच एका कार्यक्रमात पहायला मिळालं. या कार्यक्रमात सलमानसोबत त्याची भाची आयतसुद्धा होती. आयत ही सलमानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांची मुलगी आहे.
सोमवारी रात्रीसलमान मुंबईतील एका कार्यक्रमात त्याच्या भाचीसोबत पोहोचला होता. चिमुकल्या आयतचा हात हातात घेऊन सलमान चालत होता आणि त्याच्याभोवती सुरक्षारक्षक, पापाराझींचा घोळका होता. लोकांचा गराडा पाहून सलमानने त्याच्या भाचीला कडेवर उचलून घेतलं आणि पापाराझींना तिच्यापासून दहा पावलं लांब राहण्याचा इशारा दिला. सलमान आणि आयतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओमध्ये चिमुकली आयत सलमानच्या कडेवर दिसली. थोडं चालल्यानंतर सलमान तिला खाली उतरवून तिचा हात पकडून चालू लागतो.
View this post on Instagram
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)
पापाराझींच्या गर्दीत सलमान त्याच्या भाचीची काळजी घेताना दिसला. त्यानंतर त्याच्याच अंदाजात तो पापाराझींना म्हणाला, “चला.. चला मागे.. दहा पावलं लांब.. छोटी मुलगी सोबत आहे, पुढे चालत राहा.” याच व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अर्पिताने 2019 मध्ये अयातला जन्म दिला. विशेष म्हणजे अयातचा जन्म हा सलमानच्या वाढदिवशीच झाला.
सलमान खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, तो लवकरच ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये झळकणार आहे. अपूर्व लाखिया या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. त्याचा ‘सिकंदर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष गाजला नाही. यामध्ये त्याच्यासोबत रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका होती.