प्रत्येकावर नाही फक्त 'या' लोकांवरच का भुंकतात कुत्रे? कारण जाणून व्हा सतर्क
Tv9 Marathi August 12, 2025 05:45 PM

एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर पाळीव कुत्रा किंवा स्ट्रिट डॉग भुंकू लागतात, याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? काही लोकांवर कुत्रे मोठ-मोठ्याने भुंकू लागतात, पण काही लोकं कुत्र्यांच्या बाजूने आरामात निघून जातात. क्या लोकांचा कुत्र्यांवर काहीही फरक पडत नाही… याचं कारण तुम्हाला देखील नसेल माहिती. तर आज त्यामागचं कारण आपण जाणून घेवू,

काही ठराविक लोकांवर कुत्रे का भुंकतात?

बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं कीकुत्रे फक्त अनोळखी लोकांवर भुंकतात, पण सत्य हे आहे की त्यामागील संपूर्ण सत्य हे नाही. कुत्र्यांना वास आणि ऐकण्याची विशेष शक्ती असते. माणसांच्या वासावरून आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवरून कुत्र्यांना बरंच काही समजतं.

परिसराला सुरक्षित ठेवण्यची भावना…

परिसराला सुरक्षित ठेवण्यची भावना कुत्र्यांमध्ये असते. जर कोणी अनोळखी व्यक्ती परिसरात आल्यानंतर चेतावनी देण्यासाठी कुत्रे भुंकू लागतात. त्यांना असं वाटतं की, अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरासाठी किंवा कुटुंबासाठी धोका आहे. जर एखादा अनोळखी व्यक्ती अचानक किंवा वेगाने त्यांच्याकडे आला तर ते त्याला आणखी मोठा धोका मानतात आणि अधिक भुंकतात.

भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण

अनेकदा कुत्रे देखील घाबरलेले असतात. काही कुत्रे भीतीमुळे भुंकतात. जर कुत्र्याला सामाजिकदृष्ट्या प्रशिक्षित केलं नसेल तर तो अनोळखी लोकांना घाबरतो. त्या भीतीमुळे, तो अनोळखी लोकांपासून दूर राहावं म्हणून भुंकू लागतो. अनेकहा लोकं कुत्र्यांना घाबरवतात. अशात कुत्रे घाबरु शकतात आणि भुंकायला सुरु करतात.

शरीरिक भाषा आणि वास

कुत्रेफक्त आवाजच नाही तर, शारीरिक भाषा देखील समजतात. जर कोणता व्यक्ती घाबरत असेल तर, कुत्रे त्यांच्यावर हल्ला करतात. त्या व्यक्तीच्या वास आणि हावभावातून त्यांना भीती जाणवते. अशा परिस्थितीत कुत्रे स्वतःला शक्तिशाली समजतात आणि त्याच्यावर भुंकू शकतात. याशिवाय, काही लोकांच्या चालण्याने किंवा कपड्यांमुळे कुत्र्यांना अस्वस्थ वाटू शकतं, ज्यामुळे ते भुंकू लागतात. त्यामुळे कुत्रे पाहिल्यानंतर सतर्क राहा…

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.