मुंबईत वसई विरार परिसरात मानवी तस्करी आणि सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. यातून समोर आलेली माहिती धक्कादायक अशी आहे. एका १२ वर्षीय बांगलादेशी मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागानं नायगावमध्ये एनजीओच्या मदतीनं एका १२ वर्षीय मुलीची सुटका केलीय. त्यानंतर मुलीनं सांगितलेली घटना हादरवणारी आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मीरा भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकानं एनजीओच्या मदतीनं मोठी कारवाई केली होती. या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे. तर अल्पवयीन पीडितेला एनजीओकडे सोपवलं आहे. एनजीओकडे अल्पवयीन मुलीनं सांगितलेली घटना भयानक अशी आहे. तीन महिन्यात तिच्यावर २०० पेक्षा अधिक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केले आहेत.
Nagpur : ट्रकने कट मारला, पत्नीच्या डोक्यावरून चाक गेलं; मृतदेह दुचाकीवरून नेण्याची पतीवर वेळ, रक्षाबंधनाला जाताना अपघातएनजीओने सांगितलं की, पीडिता शाळकरी मुलगी आहे. एका विषयात नापास झाल्यानंतर घरचे मारतील या भीतीनं घर सोडलं. त्यानंतर एका अनोळखी महिलेनं तिला कोलकात्यात आणलं. बनावट कागदपत्रांच्या आधारे गुजरातच्या नाडियादमध्ये नेलं. तिथं वृद्ध व्यक्तीनं अत्याचार करत अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केलं. त्यानंतर मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं.
१२ वर्षांची मुलगी मुंबईत आणली गेली आणि तिथं अनेक ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाले. वेश्याव्यवसायाच्या दलदलीत तिचं बालपण चिरडून टाकण्यात आलं. एनजीओ आणि पोलिसांनी तिची सुटका करून बाल कल्याण समितीकडे चिमुकलीला सोपवण्यात आलंय. सध्या तिचं समुपदेशन करण्यात येत आहे.
IPS वडिलांनी ज्या पोलीस शिपायाला बडतर्फ केलं त्याचीच बाजू मुलीने मांडली, वडिलांविरोधात लढली हायकोर्टात केसचिमुकली तिच्या घरातून निघून आल्यानंतर महिलेकडे कशी पोहोचली, तिथून ती भारतात कुठून आली आणि कुठे राहिली? याचा तपास केला जात आहे. या प्रकरणात अटक केलेल्यांमध्ये २ महिला आणि ७ पुरुष दलाल आहेत. यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.