जन्माष्टमीला मोरपिसाच्या उपायामुळे मिळणार नशिबाची साथ, काय आहेत तोडगे ते जाणून घ्या
Tv9 Marathi August 13, 2025 02:45 AM

श्रावण महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म होतो आणि मोठ्या भक्तीभावाने हा सण साजरा केला जातो. यावेळी भगवान श्रीकृष्णांची सजावट करताना त्यांच्या माथ्यावर मोरपीस लावलं जातं. त्याला कारणही तसंच आहे. धार्मिक मान्यतेनुसार, श्रीकृष्णाला मोरपीस अतिशय प्रिय आहे. राधेच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याकडे पाहीलं जातं. ज्योतिषशास्त्रात, मोरपिसाबाबत अनेक चमत्कारीक उपाय सांगितले गेले आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर राहील. तसेच आर्थिक संकट दूर होईल. मोरपीसामुळे नशि‍बाचं दारं खुलं होतं अशी मान्यता आहे.  यंदा कृष्ण जन्माष्टमी 15 ऑगस्ट रोजी शुक्रवारी आली आहे. चला जाणून घेऊयात काय उपाय आहेत ते…

आर्थिक समस्या असल्यास…. : तुम्ही गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात असाल तर पाच मोरपीस घ्या. ती पिसं भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसह ठेवा. सलग 21 दिवस त्याची पूजा करा. यामुळे आर्थिक अचडणी दूर होतील असं सांगितलं जातं.

नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी…: जन्माष्टमीला मोरपीसं घराच्या मुख्य दरवाज्यावर लावा. अशा ठिकाणी लावा की सहज नजर पडेल. धार्मिक श्रद्धेनुसार, यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. घरात सुख शांती राहील.

धन लाभ मिळावा यासाठी….: जन्माष्टमीला श्रीकृष्ण मंदिरातून मोरपीसं आणि. त्यावर गंगाजल शिंपडा आणि घरातील तिजोरीत ठेवा. 21 दिवस कुणालाही न दाखवता ठेवा. त्यानंतर पुजाघरात ठेवा. यामुळे अडकलेले पैसे परत मिळतात आणि आर्थिक अडचण दूर होते.

जन्माष्टमीला हे उपाय करा
  • जन्माष्टमीला भगवान कृष्णाच्या बालस्वरूपाचं मोरपीसाने श्रृंगार करा.
  • जन्माष्टमीला घरातील पूर्व दिशेला मोरपीस ठेवल्याने वास्तूदोष दूर होतो.
  • कामाच्या ठिकाणी मोरपीस ठेवल्याने करिअरमध्ये प्रगती होते.
  • पतीपत्नीत प्रेम वाढण्यासाठी जन्माष्टमीला बेडरूममध्ये मोरपीस ठेवा.
  • जन्माष्टमीला मुलांच्या पुस्तकात मोरपीस ठेवा.

(Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. TV9 भारतवर्ष त्याची पुष्टी करत नाही.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.