गौरी गणपतीसाठी पारंपारिक लूक करायचाय? ठुशीचे हे 10 प्रकार नक्की पाहा
Marathi August 13, 2025 08:25 PM

गणपती बाप्पा आणि गौरीचे आगमन म्हणजे घराघरात आनंद, उत्साह आणि पारंपरिक साजशृंगाराची धूम. महिलांसाठी तर सण म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर सण आला रे आला की साडी खरेदी करणे त्यावर शोभा देतील असे दागिने घेणे. आणि आपला लूक खुलवणे. साडीचे सौंदर्य अधिक खुलवणारा दागिना म्हटला, की ठुशीचे नाव अगदी पहिलेच येते. कोल्हापूरच्या दागिन्यांच्या परंपरेतली ठुशी आजही तितकीच लोकप्रिय आहे. नववारीपासून सहावारीपर्यंत कोणत्याही साडीवर ठुशी सुंदर दिसते, मग ती सोन्याची असो किंवा मोत्यांची. बाजारात ठुशीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. पाहूया, कोणते खास प्रकार तुम्ही या सणात ट्राय करू शकता. (traditional thushi necklace types)

1) साधी ठुशी
सोनेरी लहान मण्यांनी बनवलेली साधी ठुशी नाजूक दिसते आणि कोणत्याही प्रसंगासाठी योग्य असते.

2) मोत्यांची ठुशी
सोनेरी मण्यांसोबत पांढरे मोती वापरून बनवलेली ही ठुशी पारंपरिक लूकसोबतच सौम्य तेज आणते.

3) कोल्हापुरी ठुशी
कोल्हापूरची पारंपरिक ठुशी भरीव आणि जड लूकसाठी ओळखली जाते. खास पारंपरिक वेशभूषेत हा प्रकार उत्तम दिसतो.

4) पारंपारिक नक्षीकाम ठुशी
पारंपरिक नक्षीकाम आणि विविध आकाराच्या मण्यांनी बनवलेली ही ठुशी राजेशाही लूक देते.

5) मोठ्या मण्यांची ठुशी
मोठे सोनेरी मणी वापरल्याने हा प्रकार दिमाखदार दिसतो आणि गळ्याभोवती भरीवपणा आणतो.

6) छोट्या मण्यांची ठुशी
लहान सोनेरी मण्यांनी बनवलेली ही ठुशी हलकी, नाजूक आणि रोजच्या वापरासाठी योग्य आहे.

7) दोन पदरी ठुशी
दोन थर असलेली ही ठुशी समारंभात उठून दिसते आणि भरजरी साडीसोबत खुलून येते.

8) तीन पदरी ठुशी
तीन थर असलेली ठुशी भव्यतेसाठी ओळखली जाते. खास सोहळ्यांमध्ये ही उत्तम पर्याय ठरते.

9) खड्यांची ठुशी
सोनेरी मण्यांसोबत रंगीत खडे बसवलेली ही ठुशी चमकदार आणि आधुनिक टच देते.

10) नक्षीदार ठुशी
सोन्यावर सुंदर नक्षीकाम केलेली ही ठुशी इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक दिसते.

लूक कसा पूर्ण कराल?
नववारी किंवा सहावारी साडी, पारंपारिक केशभूषा, नथ, चंद्रकोर आणि ठुशी हे एकत्र आल्यावर तुमचा गौरी-गणपती लूक पूर्ण होईल. ठुशी ही फक्त दागिना नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे, त्यामुळे तिची निवड करताना पारंपरिकतेसोबतच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असा प्रकार निवडावा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.