थोडक्यात:
१५ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीचे उत्सव साजरे होतात.
हा दिवस ब्रिटिशांच्या २०० वर्षांच्या राजवटीतून मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करण्याचा आहे.
यावर्षी नेमका ७८ वा की ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होईल, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.
Independence Day 2025: दरवर्षी सगळे भारतीय १५ ऑगस्ट खूप अभिमानाने आणि उत्साहात साजरा करतात. या दिवशी सर्व शाळा, कॉलेज, ऑफिस आणि देशभर ठिकठिकाणी ध्वजारोहण केले जाते. घरांमध्ये देखील तिरंगा फडकत असतो. सगळीकडे जल्लोषाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झालेले असते. जागोजागी फक्त देशभक्तीची गाणी ऐकू येतात. प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथावर भव्य परेड आयोजित केली जाते. यामध्ये सशस्त्र सेना, सांस्कृतिक पथके आणि शाळेतील मुलं प्रात्यक्षिक करतात.
२०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून आपल्या देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र, दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी अनेकांचा गोंधळ उडाला आहे की यंदा कितवा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल.
तुम्ही देखील याच संभ्रमात असाल की यावर्षी आपण ७८वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत की ७९वा, तर पुढे दिलेली माहिती तुमच्यासाठीच
Nashik Independence Day : जुने नाशिक देशभक्तीच्या रंगात न्हाले; स्वातंत्र्यदिनासाठी तिरंगी झेंडे आणि वस्तूंची विक्री वाढली स्वातंत्र्यदिनाबाबत लोकांचा गोंधळ का उडतो?गोंधळ होण्याचं मुख्य कारण म्हणजे अनेक जण साधा हिशोब करून १९४७ (भारताला स्वातंत्र्य मिळालेलं वर्ष) सध्याच्या वर्षातून वजा करतात. जसं की, २०२५ - १९४७ = ७८. पण हा आकडा फक्त स्वातंत्र्यानंतरची पूर्ण झालेली वर्षं दाखवतो; साजरे झालेले स्वातंत्र्यदिन त्यात गृहित धरलेले नसतात.
काही जण तर मोजणी शून्यापासून सुरू करतात किंवा फक्त वर्धापन दिन मोजतात. पण खरी मोजणी १५ ऑगस्ट १९४७ रोजीच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनापासूनच सुरू होते, असं शासनाच्या आणि इतिहासाच्या नोंदी स्पष्ट सांगतात.
यंदाची थीमयावर्षीची थीम देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय ऐक्य वाढवण्यावर भर देते, विशेषतः तरुण पिढीला या उत्सवात सक्रियपणे सहभागी करण्यावर लक्ष केंद्रित आहे. भारताच्या गौरवशाली वारशाचा सन्मान आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण जपण्यासाठी देशभर विविध स्पर्धा व उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
Independence Day look: स्वातंत्र्य दिनानिमित्त एकदम हटके लूक करायचं? मग 'या' टिप्स फॉलो करा FAQsभारताचा २०२५ मध्ये कितवा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे?
(Which Independence Day will India celebrate in 2025?)
२०२५ मध्ये भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल. पहिला स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट १९४७ रोजी साजरा झाला होता, त्यामुळे गणना १९४७ पासून सुरू होते.
स्वातंत्र्यदिनाची गणना ७८वी की ७९वी कशी ठरते?
(How is the count of Independence Day decided as 78th or 79th?)
गणना करताना पहिला स्वातंत्र्यदिन म्हणजे १९४७ हा पहिला क्रमांक धरला जातो. त्यामुळे २०२५ साठी हिशोब असा होतो: २०२५ - १९४७ + १ = ७९. यामुळे २०२५ हा ७९ वा स्वातंत्र्यदिन ठरतो.
लोकांना स्वातंत्र्यदिनाच्या मोजणीबाबत गोंधळ का होतो?
(Why do people get confused about the Independence Day count?)
अनेक लोक फक्त वर्ष वजा करून (२०२५ - १९४७ = ७८) मोजणी करतात, ज्यामुळे फक्त पूर्ण झालेली वर्षे दिसतात, पण साजऱ्या झालेल्या दिवसांची खरी संख्या लक्षात घेतली जात नाही. याशिवाय काही जण मोजणी शून्यापासून सुरू करतात किंवा फक्त वर्धापन दिन मोजतात.
२०२५ च्या स्वातंत्र्यदिनाची थीम काय आहे?
(What is the theme for Independence Day 2025?)
यंदाची थीम देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यावर आधारित आहे. विशेषतः तरुण पिढीला सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तसेच, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानांचा सन्मान करण्यासाठी देशभरात विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जात आहेत.