बाळाच्या आरोग्यासाठी मालिश करणे आणि अंघोळ घालणे या गरजेच्या गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टींमुळे बाळाच्या शरीराची वाढ योग्यरित्या होण्यास मदत होते. पण, लहान मुलांना अंघोळ घालणे हे कित्येक आई-वडिलांसाठी मोठी कसरत असू शकते. पूर्वी घरातील आजी पणजी लहान मुलांना मालिश करून अंघोळ घालत असे. पण, आता यासाठी आया ठेवल्या जातात. हे ठेवणे शक्य नसेल तर सरळ बबल बाथ हा पर्याय निवडला जात आहे. बबल बाथ हे सोपा उपाय असला तरी लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.
बबल बाथ म्हणजे काय?
बबल बाथ म्हणजे पाण्याला फेसयुक्त, सुगंधित आणि रंग देऊन मुलांसाठी मजेशीर बनवले जाते.
आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी हानिकारक –
- बबल बाथमधील पाण्याला फेसयुक्त, सुगंधित आणि रंग दिल्याने मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी हे वाईट परिणाम देणारे ठरू शकते.
- लहान मुलांची त्वचा संवेदनशील असल्याने पाण्यातील केमिकल आणि कुत्रिम सुगंधामुळे त्वचेवर लालसर चट्टे येऊ शकतात.
- फेसाळयुक्त पाण्यामुळे डोळ्यांचे आरोग्य खराब होऊ शकते. या पाण्यामुळे डोळे लाल होणे, चुरचुरणे अशा समस्या उद्भवतात.
- त्वचेचा PH बदलू शकतो. ज्यामुळे त्वचा रुक्ष होऊन खाज येऊ शकते.
- बबल बाथमधील फेसाळयुक्त पाण्यामुळे युटीआयच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येणे सुरू होते.
या उपायांनी इन्फेक्शपासून मुलांना दूर ठेवता येईल –
- पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या किंवा दूध तुम्ही मिक्स करू शकता.
- नारळ तेल तेल किंवा मिक्स मिक्स आहे.
हे ही महत्त्वाचे –
- मुलांसाठी असणारे ऍलर्जी- फ्री आणि PH संतुलित बबल बाथ वापरावा.
- जास्त वेळ मुलांना ठेवू नये.
- अंघोळ झाल्यावर त्वचेला मॉइश्चरायजर वापरावे.
हेही पाहा –