rat13p28.jpg-
84265
योगपटू तन्वी रेडीज
------------
योगपटू तन्वी रेडीज हिला
लाल किल्ल्यावर निमंत्रण
खेड, ता. १३ : योगासन क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे लोटेमाळ गावच्या मातीला अभिमान वाटावा, अशी ऐतिहासिक घटना घडली आहे. लोटेची लाडकी कन्या आणि सुवर्णपदक विजेती तन्वी रेडीजला यंदाच्या १५ ऑगस्टला दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून विशेष निमंत्रण मिळाले आहे.
देशाच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या या राष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होणे, हा तन्वीच्या क्रीडाप्रवासातील एक अविस्मरणीय टप्पा ठरणार आहे. तन्वीने यापूर्वी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची आणि देशाची मान उंचावली आहे. तिच्या या यशामुळे लोटेमाळ आणि संपूर्ण खेड तालुक्यात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.