सन्मती सहकारी बँक लि. इचलकरंजीच्या अब्दुललाट शाखेतील बोगस कर्ज प्रकरणात कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ सचिन मेथे व त्यांच्या पत्नी संगीता मेथे यांनी आज 15 ऑगस्ट रोजी कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेतले. या घटनेदरम्यान पोलिस व तक्रारदारांमध्ये झटापटही झाली.
नागालँडचे राज्यपाल ला गणेशन यांचे निधननागालँडचे राज्यपाल ला गणेशन यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, राजभवनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यमान राज्यपालांचे चेन्नईच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
तरूणावर अॅसिड हल्लायूपीएससीची तयारी करणाऱ्या एका तरुणावर दोघांनी क्रूर हल्ला केला. तरुणाला बेदम मारहाण केल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्याच्यावर अॅसिड हल्ला केला. तरुण बेशुद्ध पडल्यानंतर त्याला आरोपींनी रस्त्याजवळ असलेल्या जंगल परिसरात टाकून दिले. तरुणावर सध्या अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही भयावह घटना बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडली आहे.
Pune Live: अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू, टेम्पो चालक ताब्यातकात्रज: कात्रज चौक येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडला. भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव मोहम्मद इक्बाल पठाण (वय २८ वर्षे, रा. राजस सोसायटी, कात्रज चौक) असे आहे. पठाण हे दुचाकीवरून जात असताना टेम्पोला धडकले. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील टेम्पोचालकाचे नाव अमोल वसंत भरगुडे (वय ४४, रा. लिपाने वस्ती, दत्तनगर) असे असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
Mumbai Live: २३ व्या मजल्यावरून उडी मारून दिला जीवमुंबईच्या आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेगावमधील ओबेरॉय संकुलातील इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय तरूणीने आत्महत्या केली. नैराश्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे याच ओबेरॉय संकुलातील आत्महत्येची ही चौथी घटना आहे. मुंबईतील नामांकित विद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी असून तिचे वडील मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसताना इमारतीच्या 23व्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने कोणतीही सुसाईड नोट लिहिली नव्हती. मात्र मागील काही दिवसांपूर्वी तिच्यावर अंबानी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Live: छत्रपती संभाजी नगर तालुक्यात ढगफुटीछत्रपती संभाजी नगर तालुक्यात ढगफुटीसुदृश पावसाने काही क्षणात हाहाकार झाला. मुसळधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.
पिकअप अपघातातील बाराव्या महिलेचा मृत्यूचाकण : पाईट ता. खेड गावच्या हद्दीतील कुंडेश्वर घाट रस्त्यावर पिकअप टेम्पो दरीत कोसळून दहा महिलांचा मृत्यू झाला होता. काल अकराव्या महिलेचा उपचार घेत असताना मृत्यू झाला . अपघातामध्ये जखमी झालेल्या मोशी येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लक्ष्मीबाई हरिश्चंद्र कोळेकर ( वय- ५५, रा. पापळवाडी , पाईट ता. खेड) यांचा आज मृत्यू झाला . या अपघातात आतापर्यंत बारा महिलांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली.
Bhum News: साठवण तलावाच्या सांडव्याच्या भिंती डासळल्याने फुटण्याच्या मार्गावर१५ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी रेवैया डोंगरे,जयवंत पाटील तहसीलदार ,धाराशिव येथील अधिकारी अस्करी यांच्यासह पथकाने भेट दिली.
Mumbai News: पवईत घराची भिंत कोसळली, १ जण गंभीर जखमीपवई आयआ टी फुले नगर येथील एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली असून, या घटनेत त्या घराशेजारून जाणाऱ्या दिनेश विश्वकर्मा हे ५० वर्षीय रहिवासी गंभीर जखमी झाले आहे. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्यावर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू असून अग्निमशन दल पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.
Mumbai News: मुंबई पोलिसांकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘संदेशे आते हैं’ची भावपूर्ण प्रस्तुतीस्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने मुंबई पोलिसांकडून देशभक्तीची भावना जागवणारी खास भेट देण्यात आली. आर.ए. किदवई मार्ग पोलीस ठाण्याचे पीएसआय दादासाहेब तुकाराम खुले यांनी आपल्या बासरीवर ‘संदेशे आते हैं’ या अमर देशभक्तीपर गाण्याची सुरेल प्रस्तुती देत शहीदांना आणि स्वातंत्र्याच्या भावनेला अभिवादन केले.
Barshi Live : बार्शीत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, नदीला पूरबार्शी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार हजेरी, चांदणी नदीला आला पूर
- बार्शी तालुक्यातील आगळगाव उंबरगे गावांना जोडणारा पूल गेला पाण्याखाली
- उंबरगे, भानसळे,खडकोनी, कळंबवाडी गावाचा संपर्क तुटला
- बार्शी तालुक्यातील अनेक भागात पाऊस झाल्यामुळे शेतात पाणीच पाणी
- चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे नदीनाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागली आहे.
Pune : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्नपुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रूपाली चाकणकर कार्यक्रमाला उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेस चे पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं
नवीन कार्यालयात पोडियम, कॉन्फरन्स हॉल आणि ६ केबिनचा समावेश
Buldhana Live : जिगाव प्रकल्पाजवळ जलसमाधी आंदोलन करणारे दोन आंदोलन गेले वाहूनबुलढाण्यातील जिगाव प्रकल्पात जवळ जलसमाधी आंदोलन करणारे दोन आंदोलन वाहून गेले.
एकाला पोलिसांनी वाचवलं, दुसरा अद्याप बेपत्ता
एक आंदोलक बेपत्ता झाल्याने आंदोलन करते आक्रमक
हजारोंचा जनसमुदाय जिगाव प्रकल्प स्थळी.
Nashik Live : नाशिकमध्ये मटन-चिकन शॉप सुरूच राहणारनाशिकमध्ये खाटीक समाज आक्रमक झाला असून मटन-चिकन शॉप सुरूच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे
CM Fadnavis Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त सुवर्ण कलशाचे पूजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सुवर्ण कलशाचे संजीवन समाधी मंदिर येथे पूजन झाले
Manoj Jarange Live : मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्करमनोज जरांगे पाटील यांना अचानक चक्कर आली.
सकाळपासून नांदेडमध्ये मराठा समाजाची जरांगे पाटील यांनी बैठक घेतली
शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची टीम नांदेडच्या विश्रामगृह येथे दाखल
मनोज जरांगे पाटील यांची करीत आहेत तपासणी.
Dharashiv Live : धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील मांजरा नदीला पूरमांजरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात 65 वर्षीय शेतकरी सुबराव शंकर लांडगे वाहून गेला
तीन तासांपासून सुरू शोधमोहीम;
गावकरी व NDRF टीम घटनास्थळी दाखल
पुलावरून जाताना पाय घसरून पडल्याने शेतकरी वाहून गेल्याची माहिती
घटनास्थळी भाजप आमदार राणा पाटील व ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील उपस्थित
ड्रोनच्या साह्याने प्रशासनाकडून सुरू शोधकार्य
पूरपरिस्थितीमुळे प्रशासनाचा परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
Pankaja Munde Live : मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार अर्जुन खोतकरांना राखी बांधलीस्वातंत्र्यदिनानिमित्त जालना दौऱ्यावर असलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आज शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना राखी बांधली. मुंडे आणि खोतकर कुटुंबांमध्ये घट्ट नातं असून, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे अर्जुन खोतकर यांना आपला मानसपुत्र मानायचे. त्यामुळे भावाला राखी बांधण्यासाठीच आपण येथे आल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
अर्जुन खोतकर यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना, “माझ्या राजकीय वाटचालीत सर्वात मोठा आधार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा होता. त्यानंतर आता बहीण म्हणून पंकजा मुंडे माझ्या पाठीशी उभ्या आहेत,” असे म्हटले.
Kolhapur Live : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरच्या कोगील बुद्रुक गावात शेतात तिरंगा आंदोलननागपूर–गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कोगील बुद्रुक गावात शेतात तिरंगा फडकवून अनोखे आंदोलन करण्यात आले. "शक्तीपीठ नको आमच्या वावरात" या घोषवाक्याखाली शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने हे आंदोलन पार पडले.
सुशीला गोपाळ पाटील यांच्या शेतात काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे लक्षवेधी पद्धतीने पार पडले. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये या महामार्गाविरोधात विविध ठिकाणी आंदोलने झाली.
यावेळी शेतकऱ्यांनी हातात तिरंगा घेऊन घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आंदोलनानंतर आंदोलकांनी शक्तिपीठ महामार्गाचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, सतेज पाटील यांनी शेतातच खर्डा भाकरी खाऊन सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला.
Pune Live : पुण्यातील आशा हॉटेलला लागली आगआगीत हॉटेलमधील एक कर्मचारी जखमी, रुग्णालयात दाखल
घटना पुण्यातील दत्तवाडीतील प्रसिद्ध आशा हॉटेलमध्ये सकाळी घडली
प्राथमिक अंदाजानुसार गॅस लिकेज किंवा शॉर्टसर्किट कारणीभूत
अग्निशमन दलाने तीन वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले
Live: गावठाण रस्त्यासाठी आडोळ खुर्द ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन ..आंदोलन कर्ते विनोद पवार यांनी घेतली जलसमाधी .
पोलिसांसमोरच पूर्णा नदीत मारली उडी ..
विनोद पवार गेले नदीच्या पाण्यात वाहून. .
जिगाव प्रकल्पामध्ये आडोळ गावाचे होत आहे पुनर्वसन .
शेकडो ग्रामस्थ जिगाव प्रकल्पावर पोहचले ..
मोठा पोलिस बंदोबस्त . .
प्रशासनाने अचानक गावठाण रस्ता बदलल्याने ग्रामस्थ झाले आक्रमक .
Live: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी- कोकणात जाणाऱ्या मार्गावर 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा
- माणगाव बाजारपेठ ते तिलोरे फाट्या पर्यत वाहतूक कोंडी
- सलगच्या सुट्टी मुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली
- वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा पोलीसांचा प्रयत्न
Solapur Live: जयकुमार गोरे यांच्या हस्तेजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला ध्वजारोहन सोहळासोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते स्वतंत्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहन सोहळा पार पडला.
- यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बहुमूल्य योगदान देणाऱ्या सोलापूरच्या चार हुतात्म्याच्या आठवणीना उजाळा दिला.
- सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूर जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
Kolhapur Liveupdate: कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकावलाशक्तीपीठ महामार्ग विरोधात आज १५ ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकवला आहे. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी तिरंगा फडकाऊं शक्तीपीठ नको आमच्या वावरात या टॅगलाईनखाली शक्तीपीठ महामार्ग ला विरोधी करण्यात येत आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीच्यावतीने शेतात तिरंगा फडकवत अभिनव आंदोलन करण्यात येत आहे.
Nagpur LiveUpdate: अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन ध्वजारोहण करत जलतरणपटूनी केला वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र दिन साजरा..अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन ध्वजारोहण करत जलतरणपटूनी केला वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र दिन साजरा..
- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या उपलक्षावर अंबाझरी तलावात जलतरणपटूंनी तलावाच्या मधोमध जाऊन झेंडावंदन केलं...
- या ठिकाणी येणारे जलतरणपटू 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला नित्य नियमाने तलावाच्या मधोमध जाऊन झेंडावंदन करतात आणि राष्ट्रगीत म्हणत त्याची सांगता करतात ...
- मोठ्या प्रमाणात जलतरणपटू या अभियानामध्ये सहभागी होतात नागपुरातील अंबाझरी तलावात झेंडावंदन करण्याची ही अनेक वर्षाची परंपरा सुरू आहे... या सोबतच दिव्यागं जलतरणपटू ईश्वरी पांडे ही सुद्धा यात सहभागी झाली होती...
Mumbai LiveUpdate: स्वातंत्र्यदिनानिमित्त मांसविक्री बंदीवरून आंदोलन; कल्याणमध्ये तणावाचे वातावरणकल्याण-डोंबिवली परिसरात मांसविक्रीवरील बंदीमुळे तणाव निर्माण झाला आहे. मांसविक्री सुरू ठेवण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आलीये.
MUMBAI LIVE: पालिका निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाचा कोंबडीसह आंदोलनहिंदू खाटीक समाजाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. हातात कोंबडी घेऊन समाजातील सदस्यांनी पालिका प्रशासनाच्या निर्णयाचा जोरदार विरोध व्यक्त केला. या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली आणि प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.
Mohan Bhagwat Live: सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्कल विपन्न सहायता समितीच्या परिसरात फडकावला तिरंगाभुवनेश्वर, ओडिशा येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्कल विपन्न सहायता समितीच्या परिसरात तिरंगा फडकावला. या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Latest Marathi News Live Updates : जामनेरमधील तरुणाच्या हत्येची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी- एकनाथ खडसेजामनेर येथे मोबलिंचिंग प्रकरण हे आता समोर आले आहे, या तरुणाला काही जण येतात मारहाण करतात त्यात त्याचा मृत्यू होतो,हा एक कटाचा भाग असू शकतो,या तरुणाच्या मृत्यू ची एस आय टी चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता एकनाथ खडसे यांनी केली आहे.
PM Narendra Modi Speech Live Update : २०४७ मध्ये विकसित भारत होणारच हा प्रथम संकल्प- पंतप्रधान मोदीगुलामीच्या सर्व खाणाखुणा संपविणार, एकतेचा मंत्र कधीही विसरु नका, २०४७ मध्ये विकसित भारत होणारच हा प्रथम संकल्प असल्याची पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली.
PM Narendra Modi Speech Live Update : राष्ट्रीय सुरक्षा कवच २०३५ पर्यंत आणखी मजबूत करणार- पंतप्रधान मोदीपुढील दहा वर्षांत सर्व सार्वजनिक आस्थापनांना तंत्रज्ञानाची सुरक्षा पुरवली जाणार असून राष्ट्रीय सुरक्षा कवच २०३५ पर्यंत आणखी मजबूत करणार असे पंतप्रधा मोदी म्हणाले.
PM Narendra Modi Speech Live Update : युद्धाची परिभाषा आता बदलू लागली आहे- पंतप्रधान मोदीयुद्धात आता मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, त्यामुळे युद्धाची परिभाषा आता बदलू लागली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले
PM Narendra Modi Speech Live Update : नक्षलमुक्त बस्तर आता विकासाच्या मार्गावर-पंतप्रधान मोदीदेशातील केवळ २० जिल्ह्यात आता नक्षलवाद उरला आहे, नक्षलमुक्त बस्तर आता विकासाच्या मार्गावर असून बस्तरमधील खेळाडू देशाचे नाव जगात उंचावत आहेत, असे मोदी म्हणाले.
PM Narendra Modi Speech Live Update : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची सेवा गौरवपूर्ण- पतंप्रधान मोदीसेवा समर्पण संघटन ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जगात ओळख आहे, संघाची सेवा अतिशय गोरवपूर्ण आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.
PM Narendra Modi Speech Live Update : सर्व भाषांचा अभिमान हवा- पंतप्रधान मोदीमराठीसह अनेक भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. देशातील सर्व भाषांचा आपल्याला अभिमान असायला हवा असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
PM Narendra Modi Speech Live Update : महात्मा ज्योतिबा फुलेंचा २०० वा जयंती सोहळा साजरा करणार- पंतप्रधान मोदीपंतप्रधान मोदींनी सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
India 79th Independence Day Live : स्वातंत्र्य दिनानिमित्त पवईत ६५ फुटाचा तिरंगा फडकविण्यात आलास्वातंत्र्य दिनानिमित्त रात्री बारा वाजता पवईतील हिरानंदानी मध्ये दोन बिल्डिंगच्या मधोमध २०० मीटर उंचा वरती ६५ फुटाचा तिरंगा डिके फाउंडेशनचे चेअरमन डॉक्टर राकेश बक्षी यांनी फडकवला दरवेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त असे अनेक कार्यक्रम डिके फाउंडेशनच्या वतीने करण्यात येतात.
PM Narendra Modi Speech Live Update : मत्सोत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर- पीएम मोदीशेतकी उत्पादने निर्यात आपण मोठा टप्पा गाठला आहे. मत्सोत्पादनातही भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे असं पंतप्रधा मोदी म्हणाले.
PM Narendra Modi Speech Live Update : तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट - पंतप्रधान मोदीपंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील दोन कोटी महिलांनी लखपती दीदी योजनेचा लाभ घेतला आहे, आता तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचे उदिष्ट आहे.
PM Narendra Modi Speech Live Update : प्रधानमंत्री विकसित भारत योजना आजपासून लागू, तरुणांना १५ हजार मिळणार, पंतप्रधान मोदींची घोषणापंतप्रधान मोदी म्हणाले की मी आज खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या तरुण तरुणींना १५ हजार रुपये देण्याची घोषणा करत आहे. प्रधानमंत्री विकसित भारत योजना आजपासून लागू करत असून या योजनेसाठी १ लाख कोटींची तरतूद केली आहे.
PM Narendra Modi Speech Live Update : व्यापाऱ्यांनी स्वदेशी माल विकला जातो असे बोर्ड लावावे- पंतप्रधान मोदीमी छोट्या व्यापाऱ्यांना आव्हान करतो की त्यांनी स्वदेशी माल विकला जातो असे बोर्ड लावावे. स्वदेशीचा वापर देशाला मजबूत करण्यासाठी करायला हवा असे मोदी देशाला संबोधित करताना म्हणाले.
PM Narendra Modi Speech Live Update : गेल्या काही वर्षात उद्यमशिलता देशाची मोठी ताकद बनली आहे - पंतप्रधान मोदीगेल्या वर्षात उद्यमशिलता मोठी ताकद बनली आहे. आज लाखो स्टार्टअप देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. मुद्रा योजनेत तरुण तरुणींनी कर्ज घेऊन उद्योग करत आहेत. दुसऱ्या रोजगार देत आहेत.
PM Narendra Modi Speech Live Update : आपण संशोधनावर जोर देणं गरजेचं आहे - पंतप्रधान मोदीआपण संशोधनावर जोर देणं गरजेचं आहे. औषधं, तंत्रज्ञान आणि मानवाच्या कल्याणासाठी कामी येणं गरेजचं आहे. तरुणांनी संशोधन क्षेत्रात यावं, मी त्यांना आवाहन करतो, त्याचं सहकार्य महत्त्वाचं आहे. देश आज खतनिर्मिती क्षेत्रात आत्महनिर्भर होणं गरजेचं आहे. तरुणांनी या क्षेत्रात संशोधन करणं गरेजं आहे.
PM Narendra Modi Speech Live Update : आपण मेन इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्माण करावं - पंतप्रधान मोदी१४० कोटी भारत २०४७ मध्ये विकसित भारताच्या संकल्पनेला परिपूर्ण करतील. या संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आधुनिक इकोसिस्टीम तयार करते आहे. ही सिस्टीम देशाला आत्मनिर्भर बनतील. देशातील वैज्ञानिक, अभियंता, यांना आवाहन आहे की आपलं मेन इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्माण करावं,
PM Narendra Modi Speech Live Update : भारताचं स्पेस स्टेशन बनवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत -पंतप्रधान मोदीआम्ही अवकाशात आत्मनिर्भर होतो आहे. आपण स्पेस स्टेशन बनवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मला अभिमान आहे की देशात ३०० पेक्षा जास्त स्टार्टअप स्पेस सेक्टरमध्ये काम करत आहेत. ही देशातील तरुणांची ताकत आहे. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे.
PM Narendra Modi Speech Live Update : देशाचे स्वातंत्र्याचे १०० वर्ष पूर्ण होईल, तोपर्यंत भारत अणु उर्जा क्षेत्रात १० पट पुढे असेल - पंतप्रधान मोदीआपण उर्जेसाठी दुसऱ्या देशावर निर्भर आहे. लाखो रुपये खर्च करून आपण ते खरेदी करतो. ११ वर्षाांपासून भारत या क्षेत्रात आत्मनिर्भर होतो आहे. भारत डॅम बनवतोआहे. भारत मिशन ग्रीन हॅड्रोजन घेऊन हजारो कोटी गुंतवणत आहे. भारत न्यूक्लिअर उर्जेवर लक्ष केंद्रीय करतो आहे. देशाचे स्वातंत्र्याचे १०० वर्ष पूर्ण होईल तोवपर्यंत अणु उर्जेत १० पट पुढे असू.
PM Narendra Modi Speech Live Update : लवकरच मेड इन इंडिया सेमीकंडकर बाजारात येईल- पंतप्रधान मोदीमी कोणत्याही सरकारवर टीका करणार नाही. पण आपल्या देशात ५० वर्षांपूर्वी सेमिकंडरसाठी प्रयत्न सुरु झाला. मात्र, फाईल पुढे गेल्या नाही. आज सेमिकंडकर जगाचा श्वास आहे. लवकरच मेड इन इंडिया सेमिकंडकर बाजारात येईल.
PM Narendra Modi Speech Live Update : भारताने आत्मनिर्भर होणं गरेजंचं आहे - पंतप्रधान मोदीभारताने आत्मनिर्भर होणं गरेजंचं आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी ते दिसून आलं. आपल्याकडे कोणती शस्त्र होते, हे पाकिस्तानला माहितीही पडलं नाही. जर भारत आत्मनिर्भर नसता तर ऑपरेशन सिंदूरचा यश बघायला मिळालं नसतं. कोणी शस्त्र देईल की नाही, हे सांगता आलं नसतं.
PM Narendra Modi Speech Live Update : आजपर्यंत देशाच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला दिलं गेलं - पंतप्रधान मोदीरक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही. आजपर्यंत देशाच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला दिलं गेलं. सिंधूच्या पाण्यावर फक्त भारताचा अधिकार आहे.
PM Narendra Modi Speech Live Update : अणुहल्ल्यांच्या धमक्या सहन करणार नाही, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं पाकिस्तानला थेट प्रत्यूत्तरपंतप्रधान मोदींकडून ऑपरेशन सिंदूरमधील सैनिकांचं कौतुक केलं. या सैनिकांना सॅल्यूट करण्याची संधी मला मिळाली आहे. आम्ही सैन्याला पूर्ण सूट दिली होती. त्यांनी आज पर्यंत शक्य नव्हती की कारवाई केली. त्यांनी दहशतवाद्यांवर जोरदार प्रहार केला. आम्ही दहशदवादी आणि दहशतवाद्यांना साथ देणाऱ्यांना एकच मानलंच आम्ही अणुहल्ल्यांच्या धमकी सहन करणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ब्लॅकमेल सहन केलं जाणार नाही.
PM Narendra Modi Speech Live Update : आज देशातील अनेक सरपंच, खेळाडू, समाजसेवक लाल किल्ल्यावर उपस्थित - पंतप्रधान मोदीआज देशातील अनेक सरपंच, खेळाडू, समाजसेवक उपस्थित आहेत. एकप्रकारे इथे लघू भारत जमला आहे. तंत्रज्ञानांच्या माध्यमातून आज लाल किल्ला देशविसायंबरोबर जुळला आहे.
PM Narendra Modi Speech Live Update : एक देश एक संविधान लागू करणं ही श्यामा प्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली - पंतप्रधान मोदीआम्ही आज श्यामाप्रसाद मुखर्जी यांची १२५ वी जयंती सांजरी करतो करतो आहे . त्यांनी भारताच्या संविधानासाठी बलिदान देणारे पहिले व्यक्ती होती. कलम ३७० हटवून आम्ही एक देश एक संविधान लागू गेलं. तेव्हा ती त्यांच्यासाठी खऱी श्रद्धांजली होती.
PM Narendra Modi Speech Live Update : स्वातंत्र्याचा हा उत्सव १४० कोटी जनतेच्या संकल्पनेचा उत्सव आहे - पंतप्रधान मोदीस्वातंत्र्याचं हा उत्सव १४० कोटींच्या संकल्पनेचा उत्सव आहे. हा उत्सव भारताच्या गौरवाचा उत्सव आहे. देशाच्या प्रत्येका कोपऱ्यातून भारत माता की जय हा एकच नारा निघतोय आहे. १९४७ मध्ये आपला देश स्वातंत्र्य झाला. देशाच्या अपेक्षा वाढत होत्या. मात्र, त्याबरोबरच आव्हान त्यापेक्षा जास्त होती. संविधान सभेच्या सदस्य्यांनी महत्त्वाचं कार्य पार पाडलं. भारताचं संविधान गेल्या ७५ वर्षात आपल्यााला मार्ग दाखवतो आहे.
PM Narendra Modi Speech Live Update : पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोरणपंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोरण