भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. थोड्याच वेळात ते लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवतील. ते सलग १२ व्या वेळी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी ७:३० वाजता राष्ट्रध्वज फडकवतील आणि त्यानंतर देशाला संबोधित करतील.
आज ऑपरेशन सिंदूरला १०० दिवस पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत, पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करताना त्यांच्या कार्यकाळात ऑपरेशन सिंदूर, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि कल्याणकारी योजनांचा विस्तार यावर भर देऊ शकतात. लाल किल्ल्यावरुन सर्वात जास्त वेळ भाषण देण्याचा विक्रमही पंतप्रधान मोदींच्या नावावर आहे. २०२४ मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी ९८ मिनिटे भाषण दिले होते.