आजकाल प्रॉपर्टीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. एका सामान्य माणासाला कोणत्याही महानगरात भाड्याने रहाणेही परवडणारे नाही मग घर खरेदी करण्याचा तर विचारच करु शकत नाहीय दिल्लीतरी थोडे स्वस्तात फ्लॅट मिळतात. परंतू आर्थिक राजधानी मुंबई आणि बंगळुरु सारख्या शहरात चांगले घर खरदी करताना श्रीमंतानाही घाम फुटतो. सध्या सोशल मीडियावर एका प्रॉपर्टी डीलरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो एक घर दाखवत आहे. नंतर या घराची किंमत किती आहे हे तो सांगतो. ही किंमत समजल्यानंतर ९९ टक्के डिस्काऊंट मिळाले तरी मी घेऊ शकणार नाही अशा लोकांच्या प्रतिक्रीया या व्हिडीओला येत आहेत.
व्हिडीओत एक प्रॉपर्टी डिलर फ्लॅटच्या बाहेर गॅलरीत उभा आहे. आधी तो बाहेरचा नजारा दाखवतो. नंतर तो सांगतो दुबईत आपण एक असेच शानदार आणि आलिशान घर घेऊन आलो आहे. जे आतुन जितके सुंदर आहे तितकाच त्याचा बाहेरचा नजारा सुंदर आहे. डीलर संपूर्ण घरात फिरुन विविध रुम्स, किचन आणि बाथरुम असे सर्व दाखवतो. ते खूपच लक्झरी घर वाटते.परंतू शेवटी याची किंमत तो सांगतो. तेव्हा लोकांना आकडा ऐकून धक्का बसतो. तो सांगता या घराची किंमत केवळ ९२ कोटी आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
99% discount के बाद भी नहीं खरीद पाऊँगा
😢😢😢😢😢 pic.twitter.com/8pKVW0wCpM— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai)
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ( ट्वीटर ) वर @HasnaZaruriHai नावाच्या आयडीने शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहीलेय की “९९ टक्के डिस्काऊंटनंतरही खरेदी करु शकणार नाही.” एका मिनिटांच्या या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाख ४३ हजार लोकांनी पाहिले आहे आणि हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. लोकांनी मजेशीर प्रतिक्रीयाही दिल्या आहेत.
एका युजरने मस्करीत पोस्टमध्ये लिहीलेय की मी तर १०० टक्के डिस्काऊंटवर देखील खरेदी करु शकणार नाही भावा, अन्य एका युजरने लिहीलेय की, ‘भावा कुठूनदी लोन मिळवून द्या, ‘जिदंगीभर चुकते करत राहीन,’ याच प्रकारे एका युजरने लिहीले की, ‘मी गेल्या ५ वर्षांपासून पाहात आहे की हे घर आतापर्यंत विकले गेलेले नाही. ‘