लायन्स क्लबच्या स्पर्धेत
फाटक हायस्कूलचे यश
रत्नागिरी : ऑगस्ट क्रांतीदिननिमित्त लायन्स क्लब रत्नागिरीने आयोजित केलेल्या संचलन, वेशभूषा आणि घोषवाक्य स्पर्धेत फाटक हायस्कूलने यश संपादन केले. रॅलीतील उत्कृष्ट संचालनासाठी फाटक हायस्कूलमधील ९वी क मधील महाराष्ट्र छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व वैशाली राठोड हिला वेशभूषेसाठी तृतीय क्रमांकाचे आणि घोषवाक्य स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. विजेता स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. एमसीसीच्या विद्यार्थ्यांना मंदार सावंत यांचे, वेशभूषेसाठी आकांक्षा भोवड यांचे तर घोषवाक्य स्पर्धेसाठी दिनेश नाचणकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा आणि संस्थेच्यावतीने मुख्याध्यापकांनी कौतुक केले.