1. मृणाल ठाकूरचा बिपाशा बसूबद्दलचा जुना बॉडी-शेमिंग व्हिडिओ व्हायरल.
2. नेटकऱ्यांनी मृणालवर तीव्र टीका करत ट्रोल केलं.
3. व्हिडिओ कुमकुम भाग्य मालिकेच्या सेटवरील जुना क्लिप आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने मराठी सिनेसृष्टीतसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडताना दिसत आहे. परंतु सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिचा नुकताच 'सन ऑफ सरदार 2 ' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. तर दुसरीकडे तिच्या धनुषसोबत अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान आता तिचा जुना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलय.
सगळ्यांना माहिती आहे की, 'मृणालनं कमी वयातच सिनेसृष्टीत पदार्पण केलय. परंतु करिअरच्या सुरुवातीला तिने बिपाशा बसूबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता तिचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. तिच्या वक्तव्यामुळे तिला ट्रोल देखील करण्यात आलय.'
View this post on InstagramA post shared by Latest Scoop (@latest.scoop.official)
जुन्हा व्हायरल व्हिडिओमध्ये मृणालने बिपाशावर बॉडी शेमिंग केलीय. हा व्हिडिओ कुमकुम भाग्य मालिकेतील सेटवरचा आहे. या व्हिडिओमध्ये मृणाल तिच्या मित्राला अर्जित तनेजासोबत बोलताना दिसतेय. त्याने बिपाशा खूप आवडतअसल्याचं सांगितलं. त्यावर ती बिपाशा बसूबद्दल बोलताना म्हणतेय की, 'ही तर पुरुषांसारखी दिसतेय. हिला मसल्स सुद्धा आहे. मी तिच्यापेक्षा भारी आहे. जा तु तिच्याशी लग्न कर' असं मृणालनं तिच्या व्हिडिोमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मृणालनं तिच्या बॉडी शेमिंगवर भाष्य केलंहोतं. आता तिचाच व्हिडिओ व्हायरल होत असल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलय. 'डबल ढोलकी' अशा प्रतिक्रिया तिच्या व्हिडिओवर येताना पहायला मिळताय.
FAQs
मृणाल ठाकूरचा कोणता व्हिडिओ व्हायरल झाला आहे?
बिपाशा बसूबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा तिचा जुना व्हिडिओ.
या व्हिडिओत मृणाल ठाकूरने काय म्हटलं आहे?
तिने बिपाशाला "पुरुषांसारखी दिसते, मसल्स आहेत" असं म्हटलं आहे.
हा व्हिडिओ कधीचा आहे?
कुमकुम भाग्य मालिकेच्या सेटवरील जुना व्हिडिओ आहे.
नेटकऱ्यांनी मृणालवर काय प्रतिक्रिया दिली?
'डबल ढोलकी' अशा ट्रोलिंग कमेंट्स आल्या.
खिलाडीने नक्की काय केलय? अक्षय कुमारची रेंज रोव्हर गाडी जप्त, पोलिसांकडून कारवाई, नक्की कारण काय?