Sunil Shetty Net Worth : मारधाडच नाही तर अनेक हळव्या भूमिका करणारा हा अभिनेता अनेकांना भावला. बारीक डोळे, शरीरयष्टीच्या बळावर त्याने अनेक चांगल्या भूमिका वठवल्या. त्याचा एक वेगळाच फॅन फॉलोअर्स तयार झाला. पुढे एकाच साचेबद्ध भूमिकेत न अडकता त्याने कॉमेडीचा ट्रॅक सुद्धा लिलया पेलला. या वयातही त्याचे फिटनेस अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचे वडील एकेकाळी मुंबईतील ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करायचे, पुढे चित्रपटात नाव आणि पैसा कमावून त्याने ते विकत घेतले.
मग ते हॉटेलच घेतले विकत
सुनील शेट्टीने एका पॉडकास्टमध्ये त्यांच्या वडीलांच्या संघर्षकथा सांगितली. त्यांचे वडील अगदी कमी वयात मुंबईत आले होते. कुटुंबाची त्यांच्यावर जबाबदारी होती. एका दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये त्यांनी नोकरी केली. अगदी पडेल ते काम केले. पुढे ते या हॉटेलचे मॅनेजर झाले. जेव्हा बॉलिवूडमध्ये अण्णाला यश मिळाले. त्याने अगोदर ते हॉटेल विकत घेतले, जिथे त्याचे वडील काम करायचे.
सुनील शेट्टींची संपत्ती किती
सुनील शेट्टी बॉलिवूडमध्ये अण्णा म्हणून ओळखले जातात. त्यांची एकूण संपत्ती 125 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जाते. चित्रपटासोबतच ते एक मोठे व्यावसायिक सुद्धा आहेत. त्याचे अनेक व्यवसाय आहेत. सुनील शेट्टी यांची पत्नी डिझायनर आहेत. माना शेट्टी मुंबईत अनेक बुटीक चालवतात. त्यांचे खंडाळ्यात जहान नावाचे एक फार्म हाऊस आहे. त्यांची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांचे 2023 मध्ये लग्न झाले.
अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक
सुनील शेट्टी यांनी अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. पुण्यातील फिटनेस कंपनी SQUATS मध्ये त्यांची गुंतवणूक आहे. याशिवाय अण्णांची S2 रिअॅलिटी अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही रिअल इस्टेट कंपनी आहे. मुंबईतील प्रसिद्ध मिस्चिफ डायनिंग बार आणि क्लब H2O ही दोन रेस्टॉरंट्स त्यांच्याच मालकीची आहेत. डॉ. वैद्य हा आणि अर्बनपायपर या दोन ब्रँडमध्ये पण त्यांची मोठी गुंतवणूक आहे. इतरही अनेक ठिकाणी त्याने गुंतवणूक केली आहे.