इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकलेल्या आकाश दीपने नुकतीच टोयोटा फॉर्च्युनर विकत घेतली होती.
मात्र त्यानंतर त्याला UP परिवहन विभागाकडून नोटीस बजावण्यात आली.
त्याला ही नोटीस का बजावण्यात आली सविस्तर जाणून घ्या.
भारतीय क्रिकेट संघासाठी नुकताच झालेला इंग्लंड दौरा यशस्वी ठरला. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितितही शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताच्या युवा खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धची ५ सामन्याची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राखण्यात यश मिळवले.
भारताच्या या यशात अनेकांचा मोठा वाटा राहिला, यात एक नाव आकाश दीप याचेही आहे. आकाश दीपने या मालिकेत चांगली कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र आता त्याच्या समोर मोठी समस्या उभी राहिली असून त्याला उत्तर प्रदेश परिवहन विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
IND vs AUS: बिहारमधील छोट्या गावातून आलो, प्रवास लांबचा पण अभिमानास्पद - आकाश दीपइंग्लंडमधील यशस्वी कामगिरीनंतर मायदेशी परतल्यावर आपल्या घरी परत जाताना आकाश दीपचे जोरदार स्वागत झाले. त्याच्यावर फुलांची उधळणही करण्यात आली. याचे व्हिडिओही व्हायरल झाले.
दरम्यान, मायदेशी परतल्यानंतर आकाशने त्याचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं. त्याने नुकतीच टोयोटा फॉर्च्युनर ही काळ्या रंगाची लक्झरी कार विकत घेतली होती. त्याने ही कार खरेदी केल्यानंतरचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात तो त्याच्या कुटुंबासमवेत दिसत होता. तसेच स्वप्न पूर्ण झाल्याचेही त्याने लिहिले होते.
View this post on InstagramA post shared by Akash Deep (@akash.deep969)
मात्र आता याच कारमुळे तो अडचणीत सापडला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार त्याने ही कार हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावल्याशिवाय चालवल्यामुळे त्याला उत्तर प्रदेश परिवहन विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. HSRP म्हणजे लोझर कोड, होलोद्राम आणि न काढता येणारे स्क्रू असलेली नंबर प्लेट. चोरी किंवा अन्य चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने लावणे भारतीय कायद्यानुसार बंधनकारक आहे.
मात्र, रिपोर्ट्सनुसार आकाश दीपला HSRP शिवायच त्याची कार देण्यात आली. त्यामुळे लखनौस्थित M/S सनी मोटार्स या डीलरशिपवर एक महिन्यांची निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यांना आता १४ दिवसात याबाबत उत्तर देणे बंधनकारक आहे. टोयोटा फॉर्च्युनर कारच्या टॉप मॉडेलची किंमत जवळपास ६२ लाख रुपये आहे.
Akash Deep: जो रूटचा त्रिफळा उडवणारा तो चेंडू No Ball? MCC ने दिला निर्णय; पुढच्या सामन्यात आकाश दीप खेळू शकेल का? आकाश दीप इंग्लंडमध्ये चमकलाआकाश दीपला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यात त्याला जसप्रीत बुमराहच्या जागेवर संधी मिळाली. या संधीचं त्याने सोनं करताना बर्मिंगहॅमला झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याने प्लेइंग इलेव्हनमधील जागा पक्की केली.
मात्र चौथ्या सामन्यात त्याला दुखापतीमुळे मुकाले लागले. पण पाचव्या सामन्यातून त्याने पुन्हा पुनरागमन केले. आकाश दीपने या दौऱ्यात ६ डावात १३ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने शेवटच्या सामन्यात नाईट वॉचमन म्हणून फलंदाजी करताना ६६ धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळीही केली होती.
FAQs१. आकाश दीपला नोटीस का मिळाली?
➤ HSRP नंबर प्लेट शिवाय कार चालवल्यामुळे आकाश दीपला नोटीस बजावण्यात आली.
(Why did Akash Deep receive the notice?)
२. HSRP म्हणजे काय?
➤ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, जी चोरी किंवा फेरफार टाळण्यासाठी असते.
(What is HSRP?)
३. आकाश दीपने कोणती कार विकत घेतली?
➤ आकाश दीपने टोयोटा फॉर्च्युनर विकत घेतली.
(Which car did Akash Deep buy?)
४. टोयोटा फॉर्च्युनरची किंमत किती आहे?
➤ टोयोटा फॉर्च्युनरच्या टॉप मॉडेलची किंमत ₹62 लाखांपेक्षा जास्त आहे.
(What is the price of the Toyota Fortuner?)
५. आकाश दीपने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत किती विकेट्स घेतल्या?
➤ आकाश दीपने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत 6 डावांत 13 विकेट्स घेतल्या.
(How many wickets did Akash Deep take in the England series?)