सोलापूर : महापालिकेच्या माय सोलापूर ॲपवरील नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा न केल्याप्रकरणी निष्काळजीपणा व गैरवर्तनाचा ठपका ठेवत महापालिकेतील आठ कर्मचाऱ्यांवर ८ हजार ९०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली, तसे आदेश अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी आदेश काढले आहेत.
Success Story: 'सातारच्या सोहम घोलपला गुगलमध्ये ४० लाखांचे पॅकेज'; कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी, संभाषणात्मक एआय सल्लागारपदी निवडमाय सोलापूर अॅपवर नागरिकांनी नोंदविलेल्या प्राप्त तक्रारीचा निपटारा मुदतीत न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. आपली तक्रार पोर्टल, माय सोलापूर अॅपवर नोंदविण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला असता, आठ कर्मचाऱ्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या विभागाशी निगडीत प्राप्त तक्रारी अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले.
ही बाब अत्यंत गंभीर व कार्यालयीन शिस्तीस बाधा पोहोचविणारी आहे. त्यासाठी दोन तक्रारी आठ आणि दहा दिवस प्रलंबित ठेवल्याने प्रेम पवार, एक तक्रार आठ दिवस प्रलंबित ठेवल्याने इम्रान बागवान, एक तक्रार पाच दिवस प्रलंबित ठेवल्याने अजिंक्य विपत, नऊ दिवस तक्रारीचे निवारण न केल्याने रघुनाथ सुरवसे, दहा दिवस तक्रारी तसेच ठेवल्याने येशूदास गायकवाड, पाच दिवस तक्रारींचे निवारण न केल्याने शिलरत्न दुड्डे आणि नऊ दिवस विषय प्रलंबित ठेवल्याने दिलीप कांबळे तर तीन दिवस तक्रारीवर कार्यवाही न केल्याने पवन वाघमारे या आठ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणी मासिक वेतनातून कपातआपली तक्रार पोर्टल/माय सोलापूर अॅपवरील नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण मुदतीत न करणे, प्रलंबित ठेवणेच्या, केलेल्या कार्यवाहीची माहिती अद्ययावत न करणे या कामकाजातील निष्काळजीपणाच्या गैरवर्तनासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना करण्यात आलेल्या दंडाची रक्कम त्यांच्या मासिक वेतनातून एकरकमी वसूल करण्यात येणार असल्याचेही अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी आदेशात म्हटले आहे.