Numerology : या मूलांकाच्या तरूणी सासरच्यांसाठी ठरतात लकी, घरात पाऊल टाकताच आनंदाची बरसात
Tv9 Marathi August 12, 2025 09:45 PM

अंकशास्त्रात, प्रत्येक मूलांकांचा एक स्वामी ग्रह असतो, जो त्या मूलांकाच्या व्यक्तिमत्त्वावर देखील परिणाम करतो. आज आम्ही तुम्हाला अशा मूलांकाच्या तरूणींबद्दल सांगणार आहोत, ज्या त्यांच्या सासरच्या लोकांसाठी खूप लकी, भाग्यवान ठरतात. याशिवाय, या मूलांकामध्ये इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत जी त्यांना खास बनवतात. चला याबद्दल जाणून घेऊया.

हा मूलांक असतो लकी

आज आपण मूलांक 3 आणि 7 असलेल्या मुलींबद्दल जाणून घेऊया. अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 17, आणि 25 तारखेला होतो, त्यांचा मूलांक 7 असतो. हा मूलांक “केतू” ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. केतू ग्रहाला भाग्य आणि आध्यात्मिक विकासाचा कारक मानले जाते. या क्रमांकाच्या मुली त्यांच्या सासरच्या लोकांसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात.

दुसरीकडे, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला होतो, त्यांचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 हा ग्रह स्वामी गुरु (गुरू) शी संबंधित आहे, जो ज्ञान, धर्म आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. या मूलांकाच्या मुलीदेखी त्यांच्या सासरच्या लोकांसाठी खूप भाग्यवान मानले जाते.

मूलांक 3 चे वैशिष्ट्य

मूलांक 3 च्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, ते खूप महत्त्वाकांक्षी, बुद्धिमान आणि सर्जनशील तसेच स्वाभिमानी असतात. हे लोक शिक्षण, प्रशासन आणि कला इत्यादी क्षेत्रात अनेकदा यश मिळवतात. जर त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं झालं तर, या क्रमांकाचे लोक कठीण काळातही हार मानत नाहीत. ते जे काम करण्याचं ठरवतात, ते काम पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाहीत.

मूलांक 7 चे वैशिष्ट्य

अंकशास्त्रानुसार, 7 अंक असलेले लोक बुद्धिमान असतात. हे लोक त्यांच्या ध्येयांसाठी समर्पित असतात. जर प्रेम जीवनाबद्दल बोलायचं झालं तर हे लोक त्यांच्या जोडीदाराशी खूप निष्ठावान असतात. 7 या मूलाकांचे लोक गूढ स्वभावाचे असतात. तसंच ते खूप शांत आणि गहन विचार करणारे असतात. 7 या अंकाखाली जन्मलेल्या मुली त्यांच्या सासरच्या लोकांसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात आणि त्या त्यांच्या सासरच्या लोकांना आनंद आणि समृद्धी देतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.