मुंबई : मायदेशात पुढील ५० दिवसांनंतर सुरू होणारी महिला एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा जिंकून आयसीसी करंडकाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार आम्ही केला आहे, परंतु त्या अगोदर होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आमची खरी ताकद स्पष्ट करणारी असेल, असे भारतीय महिला कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले.
भारत आणि श्रीलंका संयुक्त यजमान असलेली महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा ३० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. स्पर्धेच्या ५० दिवसांचे काउंटडाऊन सुरू करणारा आणि विश्वकरंडक प्रदर्शित करणारा कार्यक्रम आज आयसीसीतर्फे मुंबईत आयोजित करण्यात आला होता.
'Rohit Sharma इतका मारेल ना तुला', युवराज सिंगने कोणाला दिली वॉर्निंग? पाहा Videoएकदिवसीय असो वा टी-२० गेल्या काही स्पर्धांमध्ये भारताला संभाव्य विजेत्या संघात स्थान दिले जाते, परंतु एकापेक्षा एक विश्वविख्यात खेळाडू असतानाही अद्याप एकही आयसीसी करंडक जिंकता आलेला नाही. २०१७ मध्ये मिळालेले उपविजेतेपद ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. त्या वेळी विजेतेपद थोडक्यात निसटले असले तरी भारतीय महिला क्रिकेटसाठी मोठी क्रांती झाली होती.
विश्वविजेतेपदाचा अडथळा या वेळी आम्हाला पार करायचा आहे. सर्व भारतीय पाठीराखेही त्याची वाट पाहात आहेत. विश्वकरंडक ही नेहमीच खास आणि सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा असते. युवराज सिंगला पाहते तेव्हा मला मोठी प्रेरणा मिळते, असे हरमनप्रीतने सांगितले.
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी हरमनप्रीतसह त्याच्या सहकारी स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यासह माजी कर्णधार मिताली राज आणि सुपरस्टार युवराज सिंग, आयसीसीचे अध्यक्ष जय शहा उपस्थित होते.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच इंग्लंडमध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिका जिंकून आत्मविश्वास मिळवलेला आहे. आता विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते आणि त्यातून आपण कोठे आहोत हेसुद्धा समजून येते. त्यामुळे ही मालिका आम्हाला आत्मविश्वास बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरेल, आम्ही प्रशिक्षण शिबिरांमध्ये खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचे परिणाम दिसून येत आहेत, असे हरमनप्रीत म्हणाली.
याप्रसंगी २०१७ मधील स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात हरमनप्रीत कौरने केलेल्या अविस्मरणीय १७१ धावांच्या खेळीची आठवण आवर्जून काढण्यात आली. त्या खेळीबाबत विचारले असता हरमनप्रीत म्हणाली. ती खेळी केवळ माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी खास होती. त्या खेळीनंतर माझ्यातील दृष्टिकोनातही मोठे बदल झाले. त्यानंतर अंतिम सामन्यात आम्ही पराभूत झालो. मायदेशी परतलो तेव्हा विमानतळावर आमच्या स्वागतासाठी फार मोठी गर्दी झाली होती. आमचे उत्साहात स्वागत झाले होते.
WI vs PAK, Video: वेगात चेंडू आला अन् बाबर आझमचा त्रिफळा उडाला! वनडेत पाचव्यांदा भोपळाही न फोडता आऊट त्या वेळीही स्वागतासाठी उपस्थितभारतीय संघातील सध्याची हुकमी खेळाडू आणि मुंबईची जेमिमा रॉड्रिग्ज हिने २०१७ मधील भारतीय संघाच्या विमानतळावरील स्वागताच्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली माझे वय त्या वेळी १६ वर्ष होते आणि मुंबई संघातून खेळत असल्यामुळे संघटनेने आम्हाला विमानतळावर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. आम्ही पहाटे ५.३० वाजता तेथे पोहोचलो आणि मिताली राज कर्णधार असलेल्या त्या संघाचे केलेले स्वागत मी अनुभवले आणि आपल्यालाही भारतीय संघात स्थान मिळवायचे हा निर्धार केला. तसेच २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या विश्वकरंडक विजेतेपदानंतर मुंबईत झालेला अभूतपूर्व जल्लोष मी पाहिलेला आहे. त्यावेळी मला घरातून बाहेरही पडता आले नव्हते.