आपण सगळेच ट्रेनने कधी ना कधी प्रवास करतो, प्रत्येक डब्यात प्रवशांसाठी वॉशरून, टॉयलेट असतं. पण ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेट असतं की नाही असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? जर तुम्हाला उत्तर माहित नसेल, तर या हे नक्की वाचा. (photos : Social Media)
खरं तर, ट्रेनच्या इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारचे शौचालय नसते, इंजिनमध्ये फक्त एक मेकॅनिज्म सिस्टीम असते. लोको पायलटला बसण्यासाठी फक्त एक सीट असते. याशिवाय इंजिनमध्ये लोको पायलटसाठी कोणतीही सुविधा नसते . मग असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ड्रायव्हर काय करत असेल?
निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉलेटसारख्या सुविधा नसतात. यासाठी ड्रायव्हरला पुढील स्टेशनची वाट पहावी लागते.
साधारणपणे, प्रत्येक ट्रेन काही मिनिटांनी कोणत्या ना कोणत्या स्टेशनवर थांबते. जर ट्रेन लहान असेल तर तिचा थांबा किमान 1 मिनिटाचा असतो. खरं तर, मोठ्या स्टेशनवर मोठ्या गाड्यांचा थांबा 2 ते १५ मिनिटांपर्यंत असतो.
या काळात, चालकाकडे टॉयलेट इतर सुविधांसाठी पुरेसा वेळ असतो. इंजिनमध्ये टॉयलेट नसण्याचं पहिले कारण म्हणजे इंजिनमध्ये जागेचा अभाव. कारण, इंजिनमध्ये मर्यादित जागा असते, त्याते मेकॅनिज्म फिट केलेली असते.अशा परिस्थितीत, जागेचीही कमतरता असते.
याशिवाय, तांत्रिक आणि सुरक्षिततेची कारणे देखील आहेत. यामुळे, सुरुवातीपासूनच इंजिनमध्ये अशी व्यवस्था केली जात नाही. ज्यामुळे लोको पायलटला स्टेशन येईपर्यंत वाट पहावी लागते, पण स्टेशनवर चालकांसाठी विशेष टॉयलेट्स असतात.
निवृत्त रेल्वे अधिकारी म्हणाले की, इंजिनमध्ये टॉयलेट नसल्यामुळे त्यांना लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आणि उन्हाळ्यात अनेकदा समस्यांना तोंड द्यावे लागते. याबद्दल काही करावं अशी मागणी केली जात आहे.
काही नवीन आणि आधुनिक इंजिनमध्ये टॉयलेट बसवण्याचा मुद्दा अनेकदा विचारात घेण्यात आला असला तरी रेल्वे देखील यावर विचार करत आहे. यामुळे लोको पायलटना निश्चितच दिलासा मिळेल, ज्यासाठी रेल्वे देखील योजना आखत आहे.