Maharashtra Politics : काँग्रेसचा गड ढासळला! सांगलीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश
Saam TV August 13, 2025 05:45 PM
  • सांगली काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा.

  • स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का.

  • गेल्या काही दिवसांत काँग्रेसमधून अनेक नेते भाजपमध्ये दाखल.

Big Blow to Congress in Sangli: मागील काही दिवसांपासून सांगलीमध्ये काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आज ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पृथ्वीराज पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, सांगलीच्या माजी महापौर कांचन कांबळे, खासदार विशाल पाटलांचे कट्टर समर्थक मनोज सरगर आणि नगरसेविका शुभांगी साळुंखे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामधून सावरण्याआधीच सांगलीत काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

पृथ्वीराज पाटलांचा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा

भाजपाप्रवेश निश्चित झाल्यावर सांगलीचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या पदासह काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शहर जिल्हाध्यक्ष पदासह काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पाटील यांनी काँग्रेसपक्षाकडे पाठवला आहे. आज मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप पक्ष प्रवेश देखील निश्चित मानला जात आहे. सोमवारी सांगलीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात जाण्याचा निर्णय पृथ्वीराज पाटील यांच्याकडून घेण्यात आला होता.त्यानंतर पृथ्वीराज पाटलांनी आपल्या काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे आज मुंबईत पृथ्वीराज पाटलांचा भाजप प्रवेश होणार आहे.

क्रिकेटविश्वात खळबळ! भारताच्या माजी क्रिकेटरला ईडीची नोटीस, आज चौकशी, नेमकं प्रकरण काय? कोण आहेत पृथ्वीराज पाटील?

2014 मध्ये त्यांच्याकडे काँग्रेसच्या सांगली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

देशासह राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर अडचणीच्या काळात त्यांनी सांगलीचा किल्ला नेटाने लढवला

सांगलीत काँग्रेसला जिवंत ठेवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली. रस्त्यावरची लढाईही केली.

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात त्यांनी सांगली सिव्हिलसह विविध विकास कामांसाठी निधी खेचून आणला

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा इशारा

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि विशाल पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. पुढील काही दिवसांत सांगलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, त्याआधीच काँग्रेसचा किल्ला ढासळला आहे. पृथ्वीराज पाटील यांची जिल्ह्यावर मोठी पकड होती, त्यांचा भाजपला जोरदार फायदा होणार आहे. दुसरीकडे सांगलीमध्ये काँग्रेसला गळती लागली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक दिग्गजांनी काँग्रेसला हात दाखवत भाजपात प्रवेश केला आहे.

Accident : भाविकांवर काळाचा घाला, पिकअपचा भयंकर अपघात, १० जणांचा मृत्यू, ७ मुलांचा समावेश
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.