अनेकदा आपण ऑर्डर केलेल्या जेवणात झुरळ, उंदीर सापडल्याच्या बातम्या वाचत असतो. कधी रेल्वेच्या जेवणात तर कधी हॉटेलातील जेवणाबाबत अशाप्रकारच्या धक्कादायक घटना घडत असतात. परंतू जेवणात मेलेला साप सापडल्याचा प्रकार ऐकलाय का ? हो अशी घटना घडली आहे. एका बेकरीतून घेतलेल्या करी पफमध्ये चक्क मेलेल्या सापाचे पिल्लू सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तेलंगणात एक महिलेने स्थानिक बेकरीतून खरेदी केल्या करी पफमध्ये मेलेला साप सापडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे खाद्य सुरक्षेचा गंभीर मुद्दा निर्माण झाला असून चिंता व्यक्त केली जात आहे. महिलेने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी म्हटले आहे की त्यांनी जौखीनगरच्या श्रीशैला नावाच्या महिलेची तक्रार मिळाली आहे. या महिलेच्या तक्रारीनुसार तिने जादचर्ला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक बेकरीतून मुलांसाठी एक स्नॅक्स खरेदी केले,त्यात करी पफमध्ये मेलेला साप सापडला.
पोलिस निरीक्षकाने सांगितले की घरी परतल्यावर श्रीशैला नावाच्या महिलने बेकरीतून एक करी पफ खरेदी केला होता. घरी तिने तो उघडला तर तिला धक्काच बसला. पेस्ट्रीच्या आत एक मेलेल्या सापाचे पिल्लू होते. या घटनेने प्रचंड घाबरलेल्या महिलेने तातडीने जडचर्ला पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेथे प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी बेकरीचा दौरा केला. या प्रकरणात तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी स्थानिक खाद्य निरीक्षकांकडे पाठवले आहे. खाद्यनिरीक्षकाच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
येथे पाहा व्हिडीओ –
Shocking incident in Mahbubnagar! A family found a baby snake inside a curry puff ordered from a bakery in Jadcherla. The family immediately reported the matter to the bakery and police. The police have registered a case and started investigation. Stay cautious while eating out! pic.twitter.com/qOsmrywKDy
— 🇮🇳Tirish Reddy (@tirishreddy)
या घटनेनंतर या अन्नपदार्थात सापडलेल्या मेलेल्या सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांच्या विविध स्वरुपाच्या प्रतिक्रीया येत आहेत. लोकांनी खाद्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.