सातारा: आजच्या युगात कोणालाच कोणासाठी वेळ नाही, हे आपण पाहतो. अशा स्थितीत एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याचे प्रकारही अगदी विरळ होत आहेत; परंतु आपल्या दिनचर्येतला, संपर्कातला एखादा सहकारी एखाद्या समस्येत अथवा आजारपणात अडकला असेल, तर त्याला प्राधान्याने मदत करण्याचा विचार जपणारे लोकच समाजात खरे माणुसकीची फुंकर घालणारे ठरतात. याचाच प्रत्यय अंदोरी (ता. खंडाळा) येथील वर्तमानपत्र विक्रेते राजेंद्र दगडे यांनी त्यांच्या आजारपणाच्या निमित्ताने घेतला.
Success Story: 'सातारच्या सोहम घोलपला गुगलमध्ये ४० लाखांचे पॅकेज'; कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी, संभाषणात्मक एआय सल्लागारपदी निवडत्याचे झाले असे, की श्री. दगडे हे साधारण २० वर्षांपासून अंदोरी परिसरात वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. घरच्या सामान्य परिस्थितीशी दोन हात करत, ते हा व्यवसाय इमाने-इतबारे करतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशातच त्यांना तीन महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना बारामती येथील रुग्णालयात दाखल करावे लागले; परंतु परिस्थिती अतिशय सामान्य असल्याने त्यांना अन्य स्त्रोतांद्वारे आर्थिक मदत होणे गरजेचे होते.
नेमकी हीच गरज जाणून सातारा शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी श्री. दगडे यांना जमेल ती मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रयत्न सुरू केले. काही दिवसांतच सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी यांच्यासह गणेश पवार, ताजुद्दीन आगा, विकास क्षीरसागर, भास्कर भोरे आदींनी सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना तसे आवाहन केले.
MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणीया आवाहनास सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिला आणि चांगली रक्कम गोळा करून ती नुकतीच श्री. दगडे यांना त्यांच्या निवासस्थानी ‘सकाळ’चे सातारा आवृत्तीचे वितरण व्यवस्थापक संदीप निकम यांच्या उपस्थितीत त्यांना सुपूर्द करण्यात आली. या वेळी श्री. दगडे यांनी संघटनेचे पदाधिकारी, सदस्यांसह ‘सकाळ’चेही विशेष आभार मानले. ऐन मोक्याच्या वेळी मिळालेली ही मदत अतिशय मोलाची असून, ही कृतज्ञतेच्या भावनेने स्वीकारत असल्याचे सांगितले.