चिखलदरा : पावसाळ्याच्या दिवसांत मेळघाटातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था होते व तब्बल चाळीस गावांचा संपर्क तुटतो. तालुक्यातील या गावांचे रस्ते चिखलमय झालेले आहेत. वाहने चालवणे कठीण होते.
पुलांची स्थितीसुद्धा खराब आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज चिखलफेक आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.
हतरू परिसरातील ४० ते ५० गावांत पोहोचणारे रस्ते अतिशय खराब झाले आहेत. शासनाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्ते होत नाहीत. पावसाळ्यापूर्वी उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे या भागातील आदिवासी बांधवांना तारेवरची कसरत करून गावांमध्ये जावे लागते.
कोणी आजारी पडला किंवा तालुक्याच्या ठिकाणी काही कामासाठी जावे लागले तर आदिवासी बांधवांना प्रचंड हाल सहन करावे लागतात.
Dahi Handi 2025: रायगडात गोपाळकाल्याचा जल्लोष; कुठे चाबकाचे फटके, कुठे विहिरीवरील दहीहंडी, तर कुठे ‘दावण’ परंपराअनेक वेळा या रस्त्यांवरून जातासुद्धा येत नाही, तरी देखील गेल्या ७० वर्षांपासून रस्ते दुरुस्त झालेले नाहीत. या बाबीला कंटाळून आदिवासी बांधवांनी सामाजिक कार्यकर्ते भय्यालाल मावसकर यांच्या नेतृत्वात कुही गावात चिखलफेक आंदोलन केले.