ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसर्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची बरोबरीची संधी आहे. मात्र कोणतातरी एकच संघ जिंकणार हे निश्चित आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघात तिसऱ्या सामन्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना केव्हा?ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना शनिवारी 16 ऑगस्ट रोजी होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना कुठे?ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना कॅझलीज स्टेडियम, केर्न्स येथे आयोजित करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसर्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसर्या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 30 मिनिटांआधी टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपवरुन लाईव्ह सामन्याचा थरार अनुभवता येईल.
दोघांपैकी वरचढ कोण?तिसर्या सामन्यात एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल मार्श याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धुरा आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2006 पासून आतापर्यंत एकूण 27 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाचा या 27 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये दबदबा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने 27 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 9 वेळा कांगारुंचा धुव्वा उडवला आहे.
पहिल्या 2 सामन्यांमध्ये काय झालं?ऑस्ट्रेलियाने रविवारी 10 ऑगस्टला झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी मात करत 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने यासह 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर मंगळवारी 12 ऑगस्टला दक्षिण आफ्रिकेने पहिल्या पराभवाची परतफेड करत कांगारुंचा हिशोब बरोबर केला. डेवाल्ड ब्रेव्हीस याने केलेल्या स्फोटक शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 218 पर्यंत मजल मारली. कांगारुंना प्रत्युत्तरात 165 पर्यंतच पोहचता आलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 53 धावांनी विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. त्यानंतर आता शनिवारी कोणता संघ सामना आणि मालिका जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.