घरातील लोक पैसे कमवतात परंतु ते टिकत नाहीत, असे अनेकदा घडते. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरात पैशांची चणचण कायमच भासतो. कधीकधी तर खर्च भागवण्यासाठी कर्जही घेण्याची वेळ येते. वास्तूशास्त्रानुसार वास्तूमध्ये दोष असल्यामुळे अनेकदा या अडचणीचा सामना करावा लागतो.
घरात नकारात्मक उर्जा निर्माण झाल्यामुळे अनेकदा असे घडते. ही नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी आणि घरातील पैशांची चणचण कमी व्हावी यासाठी ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. या गोष्टी केल्यास घरात सुखसमृद्धी नांदते, असे म्हटले जाते.
घरातील नकारात्मक उर्जा कमी व्हावी आणि घरात पैसा खेळता राहावा यासाठी मुख्य दरवाजावर हळदीने एक स्वास्तिक काढावे. हे स्वास्तिक दक्षिणवर्ती असले पाहिजे. या स्वास्तिकामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते, असे म्हटले जाते.
घरातला ईशान्य कोपरा सर्वाधिक शुभ समजला जातो. या ठिकाणाला तुम्ही पूजास्थळ करावे किंवा या भागात माता लक्ष्मीाच फोटो ठेवावा. यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. घरातील सुख समृद्धी कायम राहते, असे म्हटले जाते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या घराला नेहमी स्वच्छ ठेवावे. भग्न देवाच्या मूर्ती घरात ठेवू नये. तसेच बंद घड्याळ, तुटलेले बूट, चप्पल घरात असतील तर ते लगेच फेकून द्यावे. या वस्तू घरात असल्यास लक्ष्मी माता रुसण्याच शक्यता व्यक्त केली जात आहे. या वस्तू घरातून काढून टाकल्यास घरात लक्ष्मी नांदते असे म्हटले जाते.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.