भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याच्या जबरदस्त फिटनेससाठी ओळखला जातो. मैदानात त्याची ऊर्जा आणि स्लिम-फिट शरीर पाहण्यासारखं असतं. अनेक चाहते नेहमी त्याला त्याच्या फिटनेसचं रहस्य विचारतात. आता हार्दिकने स्वतः इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्याचा रोजचा डाएट प्लान आणि फिटनेस रुटीन सर्वांसोबत शेअर केला आहे. हार्दिकसारखं फिट शरीर बनवायचं असेल, तर त्याचा हा डाएट प्लान तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.
हार्दिक पांड्याचा डाएट प्लान
हार्दिक पांड्या आपल्या दिवसाची सुरुवात 500 मिली (अर्धा लीटर) पाणी पिऊन करतो. यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आणि वर्कआउटसाठी तयार होतं. सकाळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म (Metabolism) सुद्धा वाढतो.
सकाळचा नाश्ता (Breakfast): वर्कआउटनंतर हार्दिक नाश्त्यात खास स्मूदी (Smoothie) घेतो. ही स्मूदी सूर्यफुलाच्या बिया (Sunflower Seeds), ओट्स, केळी, एवोकॅडो, बदाम (Almonds) आणि बदामाचे दूध (Almond Milk) वापरून बनवली जाते. या स्मूदीमध्ये सुमारे 650 कॅलरीज आणि 30 ग्रॅम प्रोटीन (Protein) असतात.
दुपारचे जेवण (Lunch): दुपारच्या जेवणाआधी हार्दिक एप्पल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) पाण्यात मिसळून पितो. यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि कॅलरी कमी घेण्यास मदत होते. जेवणात तो भारतीय पदार्थ खातो, ज्यात सुमारे 550 कॅलरीज आणि 24 ग्रॅम प्रोटीन असतात. त्याच्या जेवणात जीरा राईस, पालक आणि डाळ यांचा समावेश असतो.
संध्याकाळचा नाश्ता (Evening Snack): क्रिकेटची प्रॅक्टिस झाल्यावर हार्दिकला ओटमील (Oatmeal) खायला आवडते. यात सुमारे 600 कॅलरीज आणि 28 ग्रॅम प्रोटीन असतात. ओटमील पचायला हलकं असतं आणि भरपूर ऊर्जा देतं.
रात्रीचे जेवण (Dinner): रात्रीच्या जेवणाआधीही तो पुन्हा एकदा एप्पल सायडर व्हिनेगर पितो. रात्रीच्या जेवणात तो सहसा टोफू (Tofu), राईस आणि एशियन ग्रीन बाउल (Asian Green Bowl) खातो.
हार्दिक पांड्या दिवसभर उच्च प्रोटीन आणि कमी कॅलरी (High Protein, Low Calorie) असलेले पदार्थ खातो. यामुळेच त्याचं वजन नियंत्रणात राहतं आणि तो फिट राहतो.
हार्दिकच्या डाएटचे फायदे
हार्दिक पांड्या जो डाएट फॉलो करतो, त्यात संतुलित आहार आहे. प्रोटीनयुक्त पदार्थ मसल्स रिकव्हरीसाठी मदत करतात, तर कमी कॅलरीमुळे वजन नियंत्रणात राहतं. जर तुम्हीही फिटनेसची काळजी घेत असाल, तर हार्दिकचा हा डाएट प्लान तुमच्यासाठी एक उत्तम प्रेरणास्रोत ठरू शकतो.