भारतात 15 ऑगस्ट, स्वतंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आजच्या दिवशी सर्वसामान्यांपासून ते बड्या नेत्या, कलाकारांपर्यंत सर्वचजण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान, बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी देशाच्या शहीदांना स्मरून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण, पोस्टवर एका यूजरने कमेंट करत जावेद अख्तर यांना पाकिस्तानशी जोडले. ते पाहून जावेद अख्तर संपाले आणि त्यांनी त्या यूजर्सला चांगलेच फटकारले आहे.
जावेद अख्तर हे त्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत, जे लोकांसमोर आपले मत निर्भयपणे मांडतात आणि चुकीच्या गोष्टींना तितक्याच ताकदीने उत्तर देतात. नुकतेच याचे एक उदाहरण त्यांच्या एक्स (ट्विटर) पोस्टमध्ये दिसले. 15 ऑगस्टच्या खास प्रसंगी त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले, “माझ्या सर्व भारतीय बहिणी आणि भावांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण हे विसरता कामा नये की हे स्वातंत्र्य आपल्याला थाळीत वाढून मिळाले नाही.”
वाचा: 3 महिन्यांत 200 जणांसोबत शारिरीक संबंध, तरुण दिसण्यासाठी इंजेक्शन्स! अश्लील फोटोंनी सुरु झाले…
Happy Independence Day to all my Indian sisters and brothers . Let’s not forget this independence was not given to us on a platter . Today we must remember and salute those who Went to jails and those went to gallows for getting us Azaadi . Let’s see that we never lose this…
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu)
पाकिस्तानशी नाव जोडले
पुढे त्यांनी लिहिले की, ‘आज आपण त्या लोकांना आदरांजली वाहिली पाहिजे आणि त्यांना सलाम केला पाहिजे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुरुंगात गेले, फासावर चढले. चला, आपण हे सुनिश्चित करूया की हा अनमोल खजिना आपण कधीही गमावणार नाही.’ त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, एका युजरने कमेंट करत लिहिले की तुमचा स्वातंत्र्यदिवस तर 14 ऑगस्टला आहे. खरे तर 14 ऑगस्टला पाकिस्तानात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
Javed Akhtar troll
‘तुमच्या लायकीत राहा’
या युजरच्या या उलट्या कमेंटला उत्तर देताना जावेद अख्तर यांनी लिहिले, “बेटा, जेव्हा तुझा आजा-पणजा इंग्रजांचे बूट चाटत होते, तेव्हा माझे पूर्वज देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्यात मरत होते. तुझ्या लायकीत राहा.” यानंतर त्या युजरने आणखी काही प्रत्युत्तर दिले, पण जावेद अख्तर यांच्या समर्थनार्थ अनेकांनी त्या युजरला उत्तर दिले. एका युजरने लिहिले की, तुमच्यावर खोटी माहिती पसरवल्याच्या आणि निकृष्ट भारतीय असल्याच्या आरोपाखाली तक्रार केली पाहिजे. तुम्ही इथून निघून जावे, आम्हाला तुम्ही भारतात नको.