चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रम शाळेतील काही विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे समोर आले आहे. रक्ताच्या उलट्या झाल्याचा प्रकार घडला आहे. यात नऊ विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चंद्रपूरजिल्ह्यातील चिमूर एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या जांभुळ घाट येथील आदिवासी शासकीय आश्रम शाळेत हा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शाळेतील एकूण ५३८ विद्यार्थ्यांपैकी २६७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप आदिवासी संघर्ष समितीने केला आहे. यातील नऊ विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
Nandurbar Crime : किरकोळ वादातून मारहाण; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरणमुलांना रक्ताच्या उलट्या
शाळेत दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती ११ ऑगस्टला अचानक बिघडली. यात मुलींना रक्ताच्या उलट्या, हातापायांना सूज, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागली. यानंतर आदिवासी संघर्ष समिती सदस्यांनी शाळेत जाऊन विचारपूस केली असता शिळे अन्न दिल्याची माहिती मिळाली. एकावेळेस अनेक विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना जांभुळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.
बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुलात्रास कशामुळे याचा शोध सुरू
उपचार घेत असलेले विद्यार्थी वेदीका चौधरी (वर्ग ४), राजेश नानाजी राजनहिरे (वर्ग ७), ऋतुजा आशीष चौधरी (वर्ग १०), चांदणी इंदरशहा सिडाम (वर्ग ९), स्नेहा नरेंद्र गायकवाड (वर्ग ७), मोनाली अनिल धुर्वे (वर्ग ७), शर्वरी केशव दोडके (वर्ग १०), शिवाणी अंकोष चौधरी (वर्ग ८), अंजली उमेश फरंदे (वर्ग ४) यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या विद्यार्थ्यांना नेमका कशाचा त्रास झाला, याचा शोध घेतला जात असून, त्यांच्या विविध तपासण्या केल्या जात आहेत, अशी माहिती आदिवासी विकास विभागाने दिली.