ग्रहांच्या सेनापतीने शत्रूच्या घरातच ठाण मांडलं, 3 राशींवर पैशांची बरसात, चांगले दिवस येणार!
Tv9 Marathi August 14, 2025 12:45 PM

Daily Horoscope : ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाला साहस, वीरता तसेच पराक्रमाचे प्रतिक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा उर्जेचेही प्रतिक असते. मंगळ ग्रह ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशींवर तो वेगवेगळा परिणाम करतो. मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे काही राशींना लाभ होतो तर काही राशींवर नकारात्मक परिणाम पडतो. काही राशींना संघर्षाचा समावेश करावा लागतो. मंगळ ग्रह येत्या 14 सप्टेंबर रोजी तुळ राशीत प्रवेश करणार आहेत.

 मंगळ ग्रह सप्टेंबर महिन्यात चाल बदलणार

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह 28 जुलैपासून कन्या राशीत आहे. मंगळ ग्रह येत्या 13 सप्टेंबरपर्यंत कन्या राशीत राहणार आहे. त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी तो तुळ राशीत प्रवेश करेल. पुढे हा ग्रह 45 दिवसांसाठी तुळ राशीत असेल. मंगळ ग्रहाला सेनापतीचा दर्जा आहे. सध्या हा ग्रह कन्या राशीत आहे. कन्या राशीचे स्वामी हे बुधदेव असतात. मंगळ आणि बुध यांच्यात शत्रूत्त्व असते. तरीदेखील मंगळ ग्रहाचे कन्या राशीतील गोचर काही राशींसाठी लाभदायक ठरू शकते. सध्या एकूण तीन राशींसाठी चांगले दिवस आहेत.

वृषभ राशी

सध्या मंगळ ग्रहाच्या स्थितीमुळे वृषभ राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात नवी संपत्ती किंवा नवे वाहन खरेदी करण्याचा योग येऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल तसेच नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. या काळात विचार करूनच निर्णय घ्यावेत.

सिंह राशी

मंगळ ग्रहाची सध्याची स्थिती सिंह राशीसाठी लाभदायक आहे. सिंह राशीच्या लोकांच्या धन-संपत्ती वाढ होऊ शकते. या राशीच्या लोकांनी सध्या रागावर नियंत्रण ठेवणे गजेचे आहे. कौटुंबिक नात्यांत तणाव निर्माण होऊ शकतो. बेरोजगार लोकांना नोकरीची चांगली संधी मिळू शकते.

वृश्चिक राशी

सध्या मंगळ ग्रहाच्या स्थितीमुळे वृश्विक राशीच्या लोकांची अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. उत्पन्नात मोठी वाढ होईल. नव्या योजनांचे चांगले परिणाम दिसतील. त्यामुळे तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल. या काळात धैर्य राखणे गरजेचे आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.