infinix चा 'हा' नवीन फोन 16 ऑगस्ट रोजी भारतात होणार लाँच, किंमत 15 हजारांपेक्षा कमी
Tv9 Marathi August 15, 2025 10:45 PM

या महिन्यात भारतात Infinix Hot 60i 5G लाँच होणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. हा फोन इन्फिनिक्सच्या smart किंवा hot सिरीजमधील असू शकतो. कंपनीने अलीकडेच या फोनच्या चिपसेट, मागील डिझाइन आणि बॅटरी क्षमतेबद्दल माहिती दिली आहे. हा फोन MediaTek Dimensity प्रोसेसरने सुसज्ज असेल. जूनमध्ये, Infinix Hot 60i चे 4G व्हर्जन MediaTek Helio चिपसह बांगलादेशमध्ये लाँच करण्यात आले होते. त्यातच आता भारतात 16 ऑगस्ट रोजी Infinix Hot 60i 5G भारतात लॉंच होणार आहे.

भारतात इन्फिनिक्स हॉट 60 आय 5जी लाँच तारीख

उपलब्धता आणि अपेक्षित किंमत

फ्लिपकार्टच्या मायक्रोसाईटनुसार, इन्फिनिक्स हॉट 60 आय 5 जी 16 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होईल. कंपनीने म्हटले आहे की हा फोन शॅडो ब्लू, मान्सून ग्रीन, स्लीक ब्लॅक आणि प्लम रेड या चार रंगांच्या पर्यायांमध्ये येईल.

ट्रान्सशनच्या मालकीचा हा ब्रँड भारतात फ्लिपकार्ट आणि त्याच्या अधिकृत वेबसाइटवरून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. जूनमध्ये बांगलादेशमध्ये इन्फिनिक्सची 4G वर्जन 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 13,999 बांगलादेशी अंदाजे 10,000 रुपयेच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली. भारतात Infinix Hot 60i 5G ची किंमत त्याच्या 4G वर्जनसारखी किंवा थोडी जास्त असू शकते.

Infinix Hot 60i 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Infinix Hot 60i 5G हा Android 15-आधारित XOS 15 वर चालेल. यात 6.75-इंचाचा HD+ डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. यात MediaTek Dimensity 6400 चिपसेट आणि 6,000mAh बॅटरी असू शकते. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी 128 तास संगीत प्लेबॅक प्रदान करेल.

फोटोग्राफीसाठी, यात 50 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल, ज्यासोबत ड्युअल-एलईडी फ्लॅश लाईट्स असतील. कॅमेऱ्यात एचडीआर आणि पॅनोरामा मोड देखील असतील. मागील पॅनलमध्ये आयताकृती कॅमेरा आयलंड आणि मॅट फिनिश असेल.

या फोनला IP64 डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टन्स रेटिंग मिळेल. यात ब्लूटूथद्वारे वॉकी-टॉकी कनेक्टिव्हिटी असेल आणि त्यात वन-टॅप इन्फिनिक्स एआय फीचर असेल, जे एआय-संचालित कामे करेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.