Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर
Saam TV August 15, 2025 10:45 PM
मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मनोज जरांगे पाटील यांना अचानक चक्कर आली.

सकाळपासून नांदेडमध्ये मराठा समाजाची जरांगे पाटील यांनी बैठक घेतली

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची टीम नांदेडच्या विश्रामगृह येथे दाखल

मनोज जरांगे पाटील यांची करीत आहेत तपासणी.

धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील मांजरा नदीला पूर

मांजरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात 65 वर्षीय शेतकरी सुबराव शंकर लांडगे वाहून गेला

तीन तासांपासून सुरू शोधमोहीम;

गावकरी व NDRF टीम घटनास्थळी दाखल

पुलावरून जाताना पाय घसरून पडल्याने शेतकरी वाहून गेल्याची माहिती

घटनास्थळी भाजप आमदार राणा पाटील व ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील उपस्थित

ड्रोनच्या साह्याने प्रशासनाकडून सुरू शोधकार्य

पूरपरिस्थितीमुळे प्रशासनाचा परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

Pankaja Munde: मंत्री पंकजा मुंडे यांनी बांधली आमदार अर्जुन खोतकर यांना राखी

आज स्वातंत्र्यदिनी जालना दौऱ्यावर असलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना राखी बांधली, मुंडे आणि खोतकर कुटुंबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अर्जुन खोतकर यांना मानसपुत्र मानायचे त्यामुळे आपण भावाला राखी बांधण्यासाठी आल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. माझ्या राजकीय आयुष्यात सर्वात जास्त आधार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा होता त्यानंतर आता बहीण म्हणून पंकजा मुंडे यांचा आहे अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आजपासून पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं असणार कार्यालय

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांच्या हस्ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक आजोबांना पालकमंत्री यांच्या खुर्चीवर बसवण्याचा पहिला मान यावेळी त्यांनी दिला या कार्यक्रमास प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते... दरवेळी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर विविध विकास कामांच्या आढावा, बैठका पालकमंत्री यांना घेता याव्यात या अनुषंगाने हे स्वतंत्र दालन व्यवस्था कार्यालयात असावी यासाठी पालकमंत्री कार्यालय बनवण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

Pune: पुण्यातील आशा हॉटेलला लागली आग

आगीच्या घटनेत हॉटेलमधील कर्मचारी जखमी

उपचारासाठी कर्मचाऱ्याला रुग्णालयात केले दाखल

पुण्यातील दत्तवाडी भागात असलेल्या प्रसिद्ध हॉटेल आशा याठिकाणी आज सकाळी लागली आग

प्राथमिक माहितीनुसार ही घटना हॉटेलमधील गॅस लिकेज किंवा शॉर्टसर्किटमुळे झाला असल्याचा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे

अग्निशमन दलाकडून तीन वाहनांकडून आगीवर नियंत्रण

Kolhapur: शक्तिपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूरच्या कोगील बुद्रुक गावात शेतात तिरंगा फडकवला

नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी "तिरंगा फडकाउन शेतात शक्तिपीठ नको आमच्या वावरात" या टॅगलाईन खाली आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने शेतात तिरंगा फडकवत अभिनव आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कोगील बुद्रुक या ठिकाणी सुशीला गोपाळ पाटील यांच्या शेतात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये विविध मार्गाने आज आंदोलन आज केलं गेलं. यावेळी शेतकऱ्यांनी हातात तिरंगा देऊन शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दरम्यान शक्तीपीठ महामार्गाचा लढा आणखीन तीव्र करण्याचा निर्धार या निमित्ताने आंदोलकांनी केला आहे. दरम्यान या आंदोलनानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शेतातच खर्डा भाकरी खाऊन सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला.

मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नडगाव ग्रामपंचाय येथे ध्वजारोहण

मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बिरवाडी या ग्राम पंचायती येथे ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मतदानाला निधी देता येत नाही ,कामाला निधी देता येतो,ज्यांनी मतदान केलं त्यांनी निधी मागू नये - पंकजा मुंडे यांची कार्यकर्त्यांना तंबी

आत्ता पहिला नियोजन समितीचा निधी माझ्या हातात आला आहे. सुरुवातीला मी आले तेव्हा फक्त भाषण देण्याचं काम माझ्या हातात होतं...

पर्यावरण आणि पशुसंवर्धन खात्यामध्ये जालना एक नंबर वर राहील अशा प्रकारचं काम करणार आहे...

आमच्या इकडे पालकमंत्री अजित पवार आहेत, त्यांनी जर परवानगी दिली तर पशुसंवर्धन आणि पर्यावरणामध्ये बीडमध्ये देखील काम करेल...

ज्यांनी मतदान केलं त्यांनी निधी मागू नये , लोकांना वाटत आपण ताई सोबत फोटो काढला सेल्फी काढला, मी मतदान केलं आम्हाला निधी द्या...

मतदानाला निधी देता येत नाही ,कामाला निधी देता येतो. व्यक्तीला निधी देण आणि कामाला निधी देणे याच्यात फरक आहे...

गावठाण रस्त्यासाठी आडोळ खुर्द ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन ..

आंदोलन कर्ते विनोद पवार यांनी घेतली जलसमाधी .

पोलिसांसमोरच पूर्णा नदीत मारली उडी ..

विनोद पवार गेले नदीच्या पाण्यात वाहून. .

जिगाव प्रकल्पामध्ये आडोळ गावाचे होत आहे पुनर्वसन .

शेकडो ग्रामस्थ जिगाव प्रकल्पावर पोहचले ..

मोठा पोलिस बंदोबस्त . .

प्रशासनाने अचानक गावठाण रस्ता बदलल्याने ग्रामस्थ झाले आक्रमक .

Mumbai-Goa: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

० कोकणात जाणाऱ्या मार्गावर 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

० माणगाव बाजारपेठ ते तिलोरे फाट्या पर्यत वाहतूक कोंडी

० सलगच्या सुट्टी मुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली

० वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा पोलीसांचा प्रयत्न

Satpuda: सलग दुसऱ्या दिवशी सातपुड्यात पाऊस....

अक्राणी परिसरात सकाळ पासून मुसळधार पाऊस....

गेल्या महिन्याभराचा विश्रांतीनंतर अक्राणी परिसरात पावसाची दमदार बेटिंग...

पावसाचा पुनःआगमनाने शेतकऱ्यांमध्ये समाधान शेतकीपिकाना मिळेल जीवनदान....

जयकुमार गोरे यांच्या हस्तेजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला ध्वजारोहन सोहळा

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते स्वतंत्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहन सोहळा पार पडला.यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बहुमूल्य योगदान देणाऱ्या सोलापूरच्या चार हुतात्म्याच्या आठवणीना उजाळा दिला.यावेळी सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूर जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

पुण्यातील बॉलर पबवर गुन्हा दाखल

"ड्राय डे" च्या मद्य विक्री केल्याप्रकरणी पुण्यातील बॉलर पब वर गुन्हा दाखल

रात्री १२ नंतर "ड्राय डे" असताना सुद्धा पब मध्ये सुरू होती मद्य विक्री

स्वातंत्र्य दिनानिमित सर्वत्र "ड्राय डे" आहे, मात्र रात्री १२ नंतर सुद्धा पब मध्ये सुरू होती विक्री

पुण्यातील कल्याणीनगर भागातील पब च्या मॅनेजर वर गुन्हा दाखल

येरवडा पोलिस ठाण्यात रेमंड डिसुझा यावर नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरातल्या क्रीडांगणांसाठी 100 किमी धावला तरुण

उल्हासनगर शहरात क्रीडांगणं व्हावीत, चांगल्या दर्जाचं क्रीडा संकुल उभं राहावं, तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशानं एका तरुणानं 100 किलोमीटरची सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केलीय. वांगणी ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर 10 तास 20 मिनिटांत पार करत त्यानं स्वतःचाच विक्रमही प्रस्थापित केलाय.

कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली

संगमेश्वर साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढे रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढील धोकादायक वळणावर ही दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.दरड कोसळत असल्याने रस्त्याचा एक भाग पूर्णपणे बंद झाला आहे,  स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच दरड कोसळण्याची शक्यता होती आणि अखेर ती प्रत्यक्षात घडली. यामुळे रस्त्याचा काही भाग वाहनांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने आणि कमी वेगाने वाहने चालवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागपुरात महानगरपालिकेच्या आदेशानंतर कत्तलखाने आणि मटण विक्रीचे दुकान बंद

नागपूर शहरामध्ये मागील अनेक वर्षांपासून 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मटन विक्री साधारणतः कत्तलखाने बंदच असतात.

यामध्ये एक दिवस बंद ठेवल्याने काही फारसा फरक पडत नाही.. तसेच श्रावण मास असल्यामुळे तशी विक्री कमी आहे.... देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे... बंद ठेवायला काही हरकत नाही अशी ही प्रतिक्रिया विक्रेते देत आहे.

तेच एकाने आमच्या रोजी रोटी रोज कमाऊन आणि रोज खाणारे असल्यामुळे दुकान बंद ठेवल्यामुळे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया साम टीव्ही शी बोलताना व्यक्त केली....

कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकावला

शक्तीपीठ महामार्ग विरोधात आज १५ ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकवला आहे. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी तिरंगा फडकाऊं शक्तीपीठ नको आमच्या वावरात या टॅगलाईनखाली शक्तीपीठ महामार्ग ला विरोधी करण्यात येत आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीच्यावतीने शेतात तिरंगा फडकवत अभिनव आंदोलन करण्यात येत आहे.

कल्याणमध्ये मांसविक्री बंदीवरून आंदोलन; तणावाचे वातावरण

कल्याण-डोंबिवली परिसरात मांसविक्रीवरील बंदीमुळे तणाव निर्माण झाला आहे. मांसविक्री सुरू ठेवण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आलीये.

थकीत बिलासाठी कंत्राटदारचा आत्मदहनाचा प्रयत्न

- वर्धेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात प्रयत्न

- पोलिसांनी कंत्राटदाराला घेतले ताब्यात

- कार्यकारी अभियंता अंभोरे हे बिल काढत नसल्याचा आरोप

- आंदोलनामुळे एकच धावपळ

- दोन वर्षांपासून विविध विभागाचे देयक प्रलंबित

लातूर बार्शी महामार्गावरील पर्यायी पुलावरून पाणी

लातूर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे, जिल्ह्यातील अनेक नदी आणि नाल्यांना पूर आला आहे. लातूर बार्शी महामार्गावरच्या बोरगाव काळे येथे महामार्गावरील पर्यायी पुलावरून पाणी वाहत असल्याने महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.., दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून हालचालींना वेग आला आहे

सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. भारतीय स्वतंत्र दिनाचा 79 स्वातंत्र्य दिन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी पालकमंत्री यांनी प्रशासनातील विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान केला. यावेळी जिल्ह्यातील खासदार,आमदार, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आदीजन उपस्थित होते.

राज्याचे क्रीडा मंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण....

नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री माणिकराव कोकाटेनी केलं ध्वजारोहण...

खाते बदलून क्रीडा मंत्री झाल्यानंतर प्रथमच कोकाटेंच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न....

ध्वजारोहणासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींचे उपस्थिती...

Kolhapur: भर पावसात कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ आज कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व मुख्य शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भर पावसामध्ये ध्वजारोहण करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वच अधिकारी हे पावसामुळे भिजल्याचे पाहायला मिळालं.

Nagpur: भाजपच्या विभागीय कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपूरातील भाजपच्या विभागीय कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्याय…

या कार्यक्रमात नागपूरातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य ध्वजाहरणाचा कार्यक्रम पार पडला,भारतीय स्वतंत्र दिनाचा 79 स्वातंत्र्य दिन धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात पार पडला यावेळी पालकमंत्री यांनी प्रशासनातील विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान केला यावेळी जिल्ह्यातील खासदार,आमदारांची उपस्थिती होती.

वाशिम येथे पालकमंत्री तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न...

भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्वा वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी ९ वाजता वाशिमचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत येथे शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी वीर सैनिकांच्या पत्नी,पोलिस अधीक्षक, अधिकारी,कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील प्रशासनात काम करणाऱ्या विविध अधिकारी,कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण

राज्याचे जलसंधारण व मृद तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी विविध क्षेत्रातील कर्तव्य बजावणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच जिल्ह्यातील सर्व विभागात तंबाखू मुक्त करण्याच्या दृष्टीने शपथ देण्यात आली.

शालेय मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते अमरावती मध्ये पार पडला शासकीय ध्वजारोहन सोहळा

79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात शालेय मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले.. यावेळी खासदार अनिल बोंडे,यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि सगळ्या विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन मंत्री दादा भुसे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.. यावेळी दादा भुसे यांनी केंद्र आणि राज्यातील योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचन्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा अस आवाहन केलं..

Girish Mahajna: पालकमंत्री नसतानाही तिसऱ्यांदा गिरीश महाजन यांना नाशिकच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा मान

नाशिकला अद्याप पालकमंत्री लाभलेले नसतांना मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज स्वातंत्र्यदिन निमित्ताने शासकीय ध्वजारोहन सोहळा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी संपन्न होणार आहे. 26 जानेवारी, 1 मे नंतर तिसऱ्यांदा पालकमंत्री नसताना गिरीश महाजन यांना नाशिकला ध्वजारोहणाचा मान देण्यात आला आहे..

Jayakwadi: जायकवाडी धरणाला तिरंगा रोशनाई

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मातीचे धरण अशी ओळख असलेल्या जायकवाडी धरणाला तिरंगा रोशनाई करण्यात आली आहे. त्यामुळे हे धरण अधिकच खुलून दिसतंय. जायकवाडी धरणावर छत्रपती संभाजीनगर जालना यासह 300 पेक्षा अधिक खेड्याची तहान अवलंबून आहे. आणि यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या बारा तासापासून संततधार पाऊस असल्यामुळे पाणी पातळी अधिक वाढणार आहे सोबतच गोदावरी नदीलाही पाणी येणार आहे.

Nashik: नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण सोहळा

- आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा

- तर आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर रस्त्यावर आंदोलकांनी दिली राष्ट्रध्वजाला सलामी

- मागील ३७ दिवसांपासून आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर रस्त्यावर सुरू आहे रोजंदारीवरील शिक्षकांचं बिऱ्हाड आंदोलन

Nagpur: नागपूरच्या महालातील संघ मुख्यालयात थोड्याच वेळात ध्वजारोहण करणार...

महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

ध्वजारोहन पूर्वी भारत मातेचे प्रतिमेच पूजन होईल. त्यानंतर ध्वजारोहण होईल...

Independence Day: पवना धरणावर आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई, सहा दरवाजे उघडत दिली सलामी...

मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण भरले आहे. 79 वा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगा विद्युत रोषणाई करत धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. या पाणी विसर्गावर तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करून जणू तिरंगा आमची जान, तिरंगा आमची शान, तिरंगा आमचा अभिमान असे सांगत तिरंग्याला सलाम केल्याची भावना व्यक्त होत आहे...

दरम्यान हे मनमोहक दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी पवनानगर वासियासह परिसरातील नागरिक गर्दी करत आहे...

Ajit Pawar: अजित पवार यांच्या हस्ते बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आज उपस्थित राहिले असून त्यांच्या हस्ते बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते

५० वर्षांपूर्वीची आणीबाणी लावली, संविधानाची हत्या झाली.- पीएम मोदी

५० वर्षांपूर्वीची आणीबाणी लावली, संविधानाची हत्या झाली

आणीबाणीच्या आठवणी आपण कधीच विसरु नयेत

मराठीसह इतर भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला- पीएम मोदी

मराठीसह इतर भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला

सांस्कृतिव वैविध्य ही आमची कादद

आपल्याला भारतीय भाषांचा अभिमान असायला हवा

३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दीष्ट-पीएम मोदी

३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दीष्ट

२ कोटी महिला या लखपती दीदी झाल्या- पीएम मोदी

अन्नधान्य, भाजीपाला उत्पादनातदेखील भारत दुसऱ्या स्थानी- पीएम मोदी

जगात मस्त्योददपान दुसऱ्या स्थानी

अन्नधान्य, भाजीपाला उत्पादनातदेखील दुसऱ्या स्थानी

चार लाख कोटींची शेतकरी उत्पादने निर्याद- पीएम मोदी

आजपासून युवकांसाठी १ लाख कोटींची नवीन योजना लागू- पंतप्रधान नरेंद्र मोदी

युवकांनाही गिफ्ट

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजन

आजपासून युवकांसाठी १ लाख कोटींची नवीन योजना लागू होणार

दिवाळीत सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार- पंतप्रधान मोंदीची लाल किल्लायवरुन घोषणा

दिवाळीत सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार

हीच ती वेळ इतिहास घडवण्याची

समृद्ध भारत हाच न्यायाचा मंत्र

स्वावलंबी होण्यासाठी सर्वोत्तम व्हायला हवे- पीएम मोदी

भारताची प्रगती हा राजकीय अजेंडा नाही- पीएम मोठी

भारताची प्रगती हा राजकीय अजेंडा नाही

पंतप्रधान मोंदीचा स्वदेशी मंत्र

PM Modi: देशातील विविध क्षेत्रात लाखो स्टार्टअप उदयाला - पीएम मोदी

पीएम मोदी -

देशातील विविध क्षेत्रात लाखो स्टार्टअप उदयाला

११ वर्षात उद्यमशीलता भारताची ताकद बनवली आहे

PM Modi: कल्पना घेऊन या मी तुमच्यासोबत आहे, तरुणांना पीएम मोदींचे पुढे येणाचं आव्हान

तरुणांना मोदींचे पुढे येणाचं आव्हान

नव्या कल्पना आणुया

कल्पना घेऊन या मी तुमच्यासोबत आहे

मोठी स्वप्न पाहा, एक क्षणही फुकट घालवू नका

PM Modi: अवकाश संशोधनातही भारत आत्मनिर्भर - पीएम मोदी

पीएम मोदी -

अवकाश संशोधनातही भारत आत्मनिर्भर

खतांसाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही

ईव्ही बॅटरी देशात निर्माण व्हावी

PM Modi: देशातल्या तरुणांच्या सामर्थ्यावर मला विश्वास - पीएम मोदी

पीएम मोदी -

देशातल्या तरुणांच्या सामर्थ्यावर मला विश्वास

मेड इन लढाऊ विमानांसाठी भारतीय जेट इंजिन हवंय

भारतीय जेट इंजिनसाठी युवा संशोधकांनी संशोधन करावं

Nashik: नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण सोहळा

नाशिक -

- नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण सोहळा

- आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा

- तर आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर रस्त्यावर आंदोलकांनी दिली राष्ट्रध्वजाला सलामी

- मागील ३७ दिवसांपासून आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर रस्त्यावर सुरू आहे रोजंदारीवरील शिक्षकांचं बिऱ्हाड आंदोलन

PM Modi: वर्षअखेरपर्यंत मेड इन इंडिया चीप बाजारात येईल - पीएम मोदी

पीएम मोदी -

न्यूक्लिअर ऊर्जा क्षेत्रामध्ये वेगाने काम सुरू

वर्षअखेरपर्यंत मेड इन इंडिया चीप बाजारात येईल

समुद्रातील तेल आणि गॅसचा शोध घेतला जात आहे

PM Modi: अणूऊर्जा दहापटीने वाढवण्याचा विचार - पीएम मोदी

पीएम मोदी -

अणूऊर्जा दहापटीने वाढवण्याचा विचार

सौरऊर्जा ३० पटीने वाढली आहे

ऊर्जाक्षेत्रात आत्मनिर्भर होणं महत्वाचे आहे

PM Modi: भारत आता आत्मनिर्भर झाला, दुसऱ्या देशावर निर्भर राहिल्यामुळे आपलं नुकसान - पीएम मोदी

पीएम मोदी -

भारत आता आत्मनिर्भर झाला आहे.

दुसऱ्या देशावर निर्भर राहल्यामुळे देशाचे मोठे

संरक्षण क्षेत्रात आपण आत्मनिर्भर बनतोय

तंत्रज्ञानाची कास धरणारे देश विकासाच्या शिखरावर पोहचले

PM Modi: आम्ही सैन्य दलाला पूर्ण मुभा देण्यात आली - पीए मोदी

पीएम मोदी -

पहलगाम हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश संतापला

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली.

देशात गेली कित्येक वर्षे झाली नाही अशी कारवाई सैन्यदलाने

आम्ही सैन्य दलाला पूर्ण मुभा दिली

दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे सारखेच

PM Modi: रक्त आणि पाणी यापुढे एकत्र वाहणार नाही - पीएम मोदी

पीएम मोदी -

सिंधू पाणीवाटप करार हा अन्यायकारक होता हे आता देशाला समजले

रक्त आणि पाणी यापुढे एकत्र वाहणार नाही

अन्यायकारक सिंधू पाणी करार स्थगित केला

भारताच्या हक्काचे पाणी आतापर्यंत पाकिस्तानला दिले

PM Modi: दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे सारखेच - पीएम मोदी

पीएम मोदी -

पहलगाम हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश संतापला

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली.

देशात गेली कित्येक वर्षे झाली नाही अशी कारवाई सैन्यदाने केली

दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे सारखेच

PM Modi: अणूबॉम्बच्या धमक्यांना आता आम्ही भीक घालत नाही - पीएम मोदी

पीएम मोदींनी ऑपरेशन सिंदूरच्या शूरविरांना सलाम केले

अणुबॉम्बच्या धमक्यांना आता आम्ही भीक घालत नाही

अणुबॉम्बच्या धमक्यांना आता सहन करणार नाही

PM Modi: दहशतवाद्यांना मदत कराल तर कारवाई होईल - पीएम मोदी

पाकिस्तानानातले नुकसान एवढं मोठं की रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे पोशिंदे वेगळे आहेत

दहशतवाद्यांना मदत कराल तर कारवाई होईल

PM Modi: ऑपरेशन सिंदूरच्या वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली - पीएम मोदी

पीएम मोदी -

ऑपरेशन सिंदूरच्या वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली

आज देशातील १४० कोटी नागरिक तिरंग्याच्या रंगात रंगले आहेत.

PM Modi: देश एकतेची भावना बळकट करत आहे - पीएम मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. देश एकतेची भावना बळकट करत आहे. हा सामूहिक कामगिरी आणि अभिमानाचा क्षण आहे. आज आपण तिरंग्याच्या रंगात रंगलो आहोत.

Nagpur: नागपूर शहर पोलीस दलातील ४ अधिकारी आणि ४ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

नागपूर -

- नागपूर शहर पोलीस दलातील चार अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

- विशिष्ट सेवा पदक आणि उल्लेखनीय सेवा पदक जाहीर

- नागपूरचे सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना विशिष्ट सेवा पदक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांना उल्लेखनीय सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे

- यासोबतच पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, महिला पोलीस शिपाई वैशाली कुकडे,लक्ष्मी गोखले,शीतल खडसे,शिला बडोले यांनाही विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे

PM Modi: पीएम मोदींनी सलग १२ व्यांदा लाल किल्ल्यावरून केलं ध्वजारोहण

पीएम मोदींनी लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण

सलग १२ व्यांदा पीएम मोदींनी केलं ध्वजारोहण

थोड्याच वेळात देशवासियांना संबोधित करणार

Delhi: पीएम मोदींनी लाल किल्ल्यावर दाखल

पीएम मोदी लाल किल्ल्यावर दाखल

सलग १२ व्यांदा करणार ध्वजारोहण

देशवासियांना संबोधित करणार

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर मोठी गर्दी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.