एलआयसी योजना बातम्या: बचत (Saving) ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही तुमच्या छोट्या बचतीच्या माध्यमातून मोठा निधी बनवू इच्छित असाल, तर भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ची एक विशेष पॉलिसी तुमच्यासाठी एक उत्तम संधी असू शकते. ही योजना केवळ सुरक्षा प्रदान करत नाही तर भविष्यात मोठा परतावा देखील देते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दररोज फक्त 45 रुपये बचत करुन तुम्ही 25 लाख रुपयांपर्यंतचा निधी तयार करु शकता.
सामान्यतः लोकांना वाटते की मोठा निधी तयार करण्यासाठी मोठी रक्कम आवश्यक असते, परंतु एलआयसीच्या या योजनेने लहान गुंतवणुकीतून मोठा निधी तयार करण्याची संधी दिली आहे. जर तुम्ही जीवन आनंद पॉलिसीमध्ये दरमहा सुमारे 1 हजार 358 रुपये म्हणजेच दररोज फक्त 45 रुपये बचत केली तर 35 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर तुम्हाला 25 लाख रुपयांपर्यंतचा निधी मिळू शकतो. यामध्ये तुम्हाला विमा संरक्षण देखील मिळते आणि बोनसद्वारे निधी देखील वाढतो.
या पॉलिसीमध्ये 35 वर्षांसाठी दरवर्षी 16 हजार 300 रुपये जमा केले तर तुमची एकूण गुंतवणूक 5 लाख 70 हजार 500 रुपये होईल. पॉलिसी परिपक्व झाल्यावर, तुमचे मुद्दल परत केले जात नाही तर बोनसच्या स्वरूपात सुमारे 20 लाख रुपयांचा अतिरिक्त फायदा देखील जोडला जातो. यामध्ये 5 लाख रुपये मूळ विमा रक्कम 8 लाख 60 हजार रुपये रिव्हिजनरी बोनस आणि 11 लाख 50000 रुपये (अंदाजे) अंतिम अतिरिक्त बोनस समाविष्ट आहे. एकूणच, तुम्हाला मॅच्युरिटीवर सुमारे 25 लाख रुपयांचा निधी मिळतो.
या पॉलिसीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ती दुहेरी बोनसचा लाभ देते. एलआयसी दरवर्षी पॉलिसीधारकाला रिव्हिजनरी बोनस देते आणि मॅच्युरिटीच्या वेळी एकरकमी अंतिम बोनस देखील जोडते. परंतू हा लाभ फक्त तेव्हाच उपलब्ध असतो जेव्हा तुमची पॉलिसी किमान 15 वर्षे जुनी असते.
या योजनेत गुंतवणूक करुन, तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिटसह विमा संरक्षण मिळते. जर दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा पॉलिसी मुदतीदरम्यान मृत्यू झाला तर नामांकित व्यक्तीला विमा रकमेसह 125 टक्केसह मृत्यू लाभ मिळतो. याशिवाय, त्यात चार प्रकारचे रायडर्स देखील जोडले जाऊ शकतात जसे की अपघाती मृत्यू, अपंगत्व, गंभीर आजार आणि टर्म इन्शुरन्स रायडर.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा