Gallantry Awards : 'ऑपरेशन सिंदूर' गाजवणाऱ्या 36 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, मराठी अधिकाऱ्यांचाही समावेश; 'हे' अधिकारी ठरले 'सर्वोत्तम योद्धा'
Sarkarnama August 16, 2025 01:45 AM

Gallantry Awards in Pune: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सैन्य दलातील शौर्य, साहस आणि कर्तव्यनिष्ठा गाजवणाऱ्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या जवानांचा समावेश आहे. तर यांपैकी काही अधिकाऱ्यांना सर्वोत्तम योद्धा अॅवॉर्डनं गौरवण्यात आलं आहे. हे सर्वजण ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होते.

पाकिस्तानविरोधात कारवाईसाठी केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या तिन्ही सैन्य दलांतील जवानांनी निकरानं लढा दिला. यामध्ये शत्रूचे कॅमेरे उद्ध्वस्त केले, काही ड्रोन हल्ले परतवून लावले त्याचबरोबर सीमा सुरक्षा बल अर्थात बीएसएफच्या जवानांनी देखील घुसखोरी रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. या सर्वांना गॅलन्ट्री अवॉर्डनं अर्थात शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

या अधिकाऱ्यांना सर्वोत्तम योद्धा पुरस्कार

लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसंच हवाई दलाच्या चार अधिकाऱ्यांना सर्वोत्तम योद्धा पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. यामध्ये उप हवाई दल प्रमुख एअर मार्शल नरनादेश्वर तिवारी, वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल जितेंद्र मिश्रा आणि डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश भारती यांचा या पुरस्कारांच्या यादीत समावेश आहे.

दरम्यान, हवाई दलाच्या १३ अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमके हल्ले करुन पाकिस्तानला हतबल केलं होतं. भारताच्या हवाई क्षेत्राच्या संरक्षणात महत्वपूर्ण भूमिका निभावल्याप्रकरणी त्यांना प्रतिष्ठित असं युद्ध सेवा पदक जाहीर झालं आहे. यामध्ये एअर व्हॉईस मार्शल जोसेफ सुआरेस, एव्हीएम प्रजुअल सिंह आणि एअर कमोडोर अशोक राज ठाकूर यांचा समावेश आहे.

Name in Voter list : तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, कसं शोधाल? जाणून घ्या, सोप्या पद्धतीनं... या मराठी अधिकाऱ्यांचा गौरव

ग्रुप कॅप्टन दीपक चव्हाण, ग्रुप कॅप्टन, कुणाल विश्वास शिंपी, विंग कमांडर देवेंद्र बाबासाहेब औताडे, स्काड्रन लीडर कौस्तूभ नलावडे, स्वाड्रन लीडर मिहीर विवेक चौधरी, स्काड्रन लीडर गौरव खोकेकर आदी मराठी अधिकाऱ्यांना वायुसेना मेडलनं गौरवण्यात आलं आहे.

२६ अधिकारी, वायुसैनिकांना वायु सेना पदक

हवाई दलातील २६ अधिकारी आणि वायुसैनिकांना वायु सेना पदकानं गौरवण्यात आलं आहे. यामध्ये लढाऊ विमानाच्या पायलट्सचाही समावेश आहे. या पायलट्सनं पाकिस्तानातील लक्ष्य भेदण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तसंच यामध्ये एस-४०० एअर डिफेन्स यंत्रणा आणि हवाई दलाची उपकरणं चालवून पाकिस्तानचे हल्ले परतावून लावलेल्या वायुसैनिकांचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑपरेशन मुरीदके आणि बहावलपूर इथल्या दहशतवादी गटांच्या मुख्यालयांना तसंच पाकिस्तानच्या सैन्य ठाण्यांना निशाना बनवणाऱ्या पायलट्स आणि अधिकाऱ्यांना वीरचक्रनं सन्मानित करण्यात आलं आहे. हे युद्धासाठीचं तिसरं सर्वोच्च पदक आहे. भारतीय हवाई दलानं या कारवाईत पाकिस्तानची सहा विमानं पाडली.

सीबीआय अधिकाऱ्यांचाही सन्मान

यानिमित्त २१ सीबीआय अधिकाऱ्यांना देखील विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिसनं सन्मानित करण्यात येणार आहे.

EVM Recounting : धक्कादायक! भारतात पहिल्यांदाच EVMचा झाला पराभव; सुप्रीम कोर्टात फेर मतमोजणीत हारलेला उमेदवार झाला विजयी एकूण १०९० पोलीस पदकं

गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, यंदा एकूण १०९० पोलीस कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये पदकं जाहीर झाली आहेत. यामध्ये केंद्रीय आणि राज्य दलांच्या जवानांचा समावेश आहे. या पदकांमध्ये अग्निशमन, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स आणि सुधार सेवा कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

यामध्ये गॅलेंट्री मेडल - २३३

राष्ट्रपती पोलीस पदक विशिष्ट सेवा मेडल - ९९

पोलीस मेडल सेवा - ७५८

शौर्य पदकांसाठी

कोकणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप! उदय सामंतांना होमग्राऊंडवर नितेश राणेंचा दे धक्का, बडा नेता पळवला

जम्मू-काश्मीरमधील मोहिमांसाठी १५२ पदकं, नक्षलविरोधी अभियानासाठी ५४ पदकं, ईशान्य भारतातील कर्तव्यासाठी ३ पदकं तर अन्य विभागांसाठी २४ पदकं, अग्निशमन सेवेसाठी ४ पदकं, होमगार्ड आणि सिव्हिल डिफेन्ससाठी १ पदक जाहीर झालं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.