सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांने साखरपुडा केला आहे. 25 व्या वर्षी या ऑलराऊंडरने सानिया चंडोक हिला जीवनसाथी निवडले आहेत. चंडोक ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानिया ही साराची मैत्रिण आहे. दोघांची छायाचित्र समाज माध्यमांवर खूप व्हायरल होत आहे. अर्जुन आणि सानिया हे दोघेही एकमेकांचे परिचित आहे. हा दोघांचा प्रेमविवाह आहे. पण त्याचे वडील मास्टर ब्लास्टर सचिन हा तर प्रेमाच्या पिचवर त्याच्यापेक्षा पण अनेक पावलं पुढं होता. तेव्हा सचिन तेंडुलकर अवघा 22 वर्षांचा होता. त्यावेळी त्याने डॉ. अंजलीसोबत साखरपुडा केला आणि लागलीच त्याने लग्न पण केले.
सचिन तेंडुलकर प्रेमाच्या पिचवर बोल्ड
भारताचा दमदार क्रिकेटर सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) लग्न 25 मे 1995 रोजी झाले होते. सचिन आणि अंजलीचे लग्न एखाद्या चित्रपटाच्या पटकथापेक्षा कमी नाही. 90 च्या दशकात सचिनने दमदार कामगिरी बजावली होती. हळूहळू सचिन भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार झाला. त्याच दरम्यान सचिनची भेट अंजलीसोबत झाली. अंजलीने पहिल्यांदा 1990 मध्ये मुंबई विमानतळावर सचिनला पाहिले होते. त्याचवेळी तिला सचिन आवडला होता. त्यावेळी सचिन हा इंग्लंडच्या दौऱ्यावरून परतला होता. अंजलीने सचिनकडे ऑटोग्राफ करण्यासाठी त्याच्या मागे गेला. पुढे अंजलीने सचिनचा नंबर मिळवला. त्यानंतर दोघांमध्ये बातचीत सुरू झाली.
5 वर्षांची प्रेमकथा, मग लग्न
5 वर्षांपर्यंत दोघांचे हे अफेअर सुरु होते. अंजली ही सचिनपेक्षा वयाने मोठी आहे. 22 व्या वर्षी सचिनने साखरपुडा पण केला आणि लग्नही केले. सचिन अत्यंत लाजाळू होता. त्याला लग्नाबाबत घरी सांगता येत नव्हतं. तेव्हा त्याने अंजलीला याविषयी पुढाकार घ्यायला सांगितलं. मग अंजलीने तिच्या घरी हा विषय काढला. 1994 मध्ये सचिन आणि अंजली या दोघांचा न्युझीलंडमध्ये साखरपुडा झाला. 25 मे 1995 रोजी दोघांनी मुंबईत लग्न केले. एका लोकल टीव्ही ऑपरेटरनेतेंडुलकर कुटुंबाला लाईव्ह लग्न टेलिकास्ट करण्यासाठी 40 लाखांचा ऑफर दिली होती. पण हा लग्न सोहळा साध्या पद्धतीने करण्याचे दोन्ही कुटुंबाने सांगितले आणि ही ऑफर फेटाळली.