पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरणात ३ बीएसएनएल कामगारांचा मृत्यू
केबल दुरुस्तीसाठी ड्रेनेजमध्ये उतरले असताना दुर्घटना घडली.
एक कामगारावर लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु.
स्वातंत्र्यदिनी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ
पिंपरी-चिंचवडमध्ये एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा केला जात आहे. दुसरीकडे ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेने पिंपरी-चिंचवडमध्ये परिसरात खळबळ उडाली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील निगडीत केबल टाकण्यासाठी ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू झालाय. तिघेही कामगार हे 'बीएसएनएल' कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिघांवर काळाने घाला घातला आहे. तिघांच्या मृत्यूने या कामगारांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Shocking : कोचिंग क्लासमधील मुलीवर नराधमाची वाईट नजर; शिक्षक-विद्यार्थिनीचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, परिसरात खळबळ नेमकं काय घडलं?पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणात ड्रेनेज पाईप लाइनमधून केबल टाकत असताना दुर्दैवी घटना घडली. ड्रेनेज लाइनमध्ये विषारी वायू गळती झाल्यामुळे काम करणाऱ्या 3 कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
Maharashtra Politics : आंबेडकर-गांधी एकत्र लढणार? लोकशाही वाचवण्यासाठी 'वंचित'चं राहुल गांधींना पत्र, VIDEOनिगडी प्राधिकरणातील या दुर्देवी दुर्घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एक कामगार लोकमान्य हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. बीएसएनएलच्या केबल दुरुस्तीसाठी हे कामगार ड्रेनेजच्या झाकणातून खाली उतरले होते. त्याचवेळी ही दुर्देवी दुर्घटना घडली आहे.