एखादी व्यक्ती कोमात गेल्यानंतर नेमके काय होते ? याबाबत केवळ तिच व्यक्ती सांगू शकते जिने या परिस्थितीची सामना केलेला असेल. तसे काही लोकांना हा झोप पूर्ण करण्याचा चांगली पद्धत वाटू शकते. परंतू कोमातून वाचलेल्या लोकांशी बातचीत केली असता त्यांनी हा प्रकार बिलकुल आरामदायी नसतो.
डेली मेलच्या बातमीनुसार कोमातून जागे झालेल्या डझनावारी लोकांनी इंस्टाग्रामच्या टेक्स्ट आधारीत एप थ्रेड्सवर आपले अनुभव सांगितले आहेत. जेव्हा एका युजरन विचारले की जे लोक कोमात राहिले होते, त्यांचा अनुभव कसा होता.? ही पोस्ट लागलीच व्हायरल झाली.
कोणीच कोमाचा अनुभव आरामदायक असल्याचे म्हटले नाही.त्याऐवजी अनेक लोकांनी सांगितले की हा एक अवास्तविक, त्रास देणार आणि भयावह अनुभव होता. एका युजरने उपचारादरम्यान चार आठवडे कोमात घालवले होते. त्यांनी दावा केला की या दरम्यान तो वेग-वेगळ्या जागांवर, वेगवेगळ्या वेळी गेला, त्याने दलाई लामा आणि मदर तेरेसा यांची भेट घेतली.
युजरने सांगितले की एका समुद्रावरुन उडणाऱ्या विमान अपघातात मी जखमी झालो होता. त्यानंतर मला असे वाटले की मला अंतराळात फेकले आहे. परंतू मी हिंमत हारली नाही, हे सर्व एखादा न संपणारं विचित्र स्वप्नं होते.
एका युजरने खूपच निराशाजनक अनुभव कथन करताना सांगितले की मला सर्व अजब स्वप्नं पडली. यात असेही स्वप्नं होते की माझ्या पतीची हत्या केली आहे. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला नळ्या लावल्या होत्या. त्यामुळे मी बोलू शकत नव्हती. त्यामुळे मी विचारु शकली नाही की हे सत्य आहे का ? त्यामुळे मी कोमात जे घडलं त्यालाच सत्य मानून विश्वास ठेवला.
एका रात्री माझा पती मला भेटायला आला, तेव्हा मला खरेच वाटले की त्याचे भूत आहे. मी इतकी घाबरले की मला काही समजले नाही मी असे का करत आहे.
कोमात गेलेल्या काही लोकांनी दावा केला की त्यांनी आपले प्रियजन त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते ते त्यांना ऐकू येत होते. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा आवाज ते ऐकू शकत होते आणि ते बोलू इच्छीत होते, परंतू असे करण्यास ते असमर्थ होते.
एका नर्सने एका रुग्णा संदर्भातील किस्सा पोस्ट केला होता. त्यात त्यांनी सांगितले की त्या रुग्णाला कॅन्सर होता आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट झाला होता. ती रुग्ण एक महिनाभर कोमात होती तिने शुद्धीवर आल्यानंतर सांगितले की एक वेगळेच जीवन यादरम्यान पाहायला मिळाले. तिने एका कॅरीबियन बेटाचे वर्णन केले, जेथे ती सर्व लोकांनी भेटली, हे खूपच अजब होते.
एनएचएसने कोमाला एक बेशुद्ध अवस्थेची अशी स्थिती ज्यात व्यक्ती प्रतिक्रीयाहीन होते, आणि तिला जागे केले जाऊ शकत नाही. कोमात गेलेल्या व्यक्तीच्या मेंदूच्या गतिविधी खूपच कमी झालेल्या असतात. केव्हा केव्हा कर तो यंत्राशिवाय श्वास घेणे किंवा गिळू शकण्यास देखील असमर्थ असतो.
एनएचएस दिशानिर्देशात पुढे म्हटले आहे की ते जीवंत असतात परंतू त्यांना जागे केले जाऊ शकत नाही. आणि त्यांच्या सचेत असण्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही.व्यक्तीचे डोळे बंद असू शकतात. ते आपल्या वातावरणाप्रती उदासिन असू शकतात. ते ध्वनी किंवा दुखणे यावर देखील कदाचित प्रतिक्रीया देणार नाही, वा स्वत:च्या इच्छेने हलणे- डुलण्यास सक्षम नसतील.
कोमा अनिश्चित काळापर्यंत राहू शकतात लोक, अनेक दिवस ते महिन्यांपर्यंत तर कधी-कधी वर्षांपर्यंतही. लोक हळूहळू चेतना आणि जागृत होऊ शकतात. किंवा दुर्दैवाने कधीच जागू शकत नाहीत.