आशिया कप स्पर्धेचा थरार 9 सप्टेंबरपासून रंगणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद युएईकडे आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदा टी20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होणार आहे. भारतासह एकूण 8 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. अ गटात भारतासोबत ओमान, पाकिस्तान आणि युएई आहे. तर ब गटात श्रीलंका, हाँगकाँग, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान आहे. भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. आता हा सामना होणार की नाही? हे गुलदस्त्यात आहे. कारण वर्ल्ड लीजेंड्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. उपांत्य फेरीतही भारत पाकिस्तानविरुद्ध खेळला नव्हता. त्यामुळे भारताचा आशिया कप स्पर्धेत काय पवित्रा असेल हे काही आता सांगणं कठीण आहे. त्यात भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात कोणते खेळाडू संघात असतील याबाबतही उत्सुकता आहे. अशी सर्व पार्श्वभूमी असताना आशिया कप स्पर्धेच्या इतिहासाबाबत अनेकांना उत्सुकता आहे. ही स्पर्धा नेमकी कधी सुरु झाली? कोणत्या संघाचं वर्चस्व राहिलं आहे? आणि...