Viral Video: शेवगाव तालुक्यातल्या दहिफळ इथला एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यासाठी चक्क महिला सरपंचाची गाडी अडवली, गाडीवर चिखलफेक केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांना गाडी खाली उतरायला लावलं. चिखलात उतरताना सरपंचाची चांगलीच तारांबळ उडाली होती.
सोशल मीडियात हा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला आहे. शाळेला जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिमुकले चांगलेच चिडले होते. दुसरी ते पाचवीच्या वर्गातले या मुलांनी आधी सरपंचाची गाडी अडवली. त्यानंतर त्या गाडीवर चिखलफेक केली. काही मुलांनी तर गाडीला चिखल रगडला.
Mumbai Rain Alert: मुंबईकरांनो सावधान! हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारीतरीही सरपंच आतमध्येच बसलेल्या होत्या. त्यामुळे या मुलांनी हट्ट करत सरपंचांना खाली उतरण्यास भाग पाडलं. तेव्हा कुठे सरपंच चिखलातून सावरत बाहेर पडल्या. गाडीतून खाली कसा पाय ठेवायचा, हेच त्यांना जरावेळ कळलं नाही. नंतर मग कशाबशा उतरल्या.
मुलांनी एकच दंगा केला, रस्ता कधी करणार, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रयत्न सुरु आहेत, असं सांगितलं. त्यावर मुलं म्हणाले, इथं आमचं हाल होऊन राहिलेत, लवकरच काय तो रस्ता करा. त्यावर सरपंचांनी केवळ 'हो' म्हटलं. त्यामुळे हा रस्ता नेमका कधी होणार, दहिफळच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रशासन दरबारी सुटेल का? हाच खरा प्रश्न आहे.
View this post on InstagramA post shared by Sarkarnama (@sarkarnamanews)