विवाहित महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच आता पत्नीच्या वर्तनाला आणि मानसिक छळाला कंटाळून बुलंदशहर येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सोहित असं मृत व्यक्तीचे नाव असूव तो समाजवादी पक्षाच्या आंबेडकर वाहिनीचा राज्य सचिव होता. आत्महत्या करण्यापूर्वी सोहितने एक व्हिडिओ बनवला असून त्यात त्याने पत्नीवर आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सोहितची बहीण पूजाने सांगितले की, सोहित चार वर्षांपासून तमन्नासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता. त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते. मात्र यानंतर तमन्ना आणि तिचे कुटुंबीय सोहितला त्रास देत होते. त्यामुळे नैशाष्य आल्याने सोहितने 15 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली आहे. आता पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. आता आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
सोहितने आपल्या व्हिडिओत म्हटले की, ‘मी लवकरच आत्महत्या करणार आहे. माझ्या पत्नीने आणि तिच्या कुटुंबाने मला खूप त्रास दिला आहे, हे मी आता सहन करु शकत नाही. मरण्यापूर्वी मी माझ्या पत्नीच्या अवैध संबंधांबद्दल सांगू इच्छितो. मी माझी पत्नी तमन्नासोबत तीन वर्षांपासून राहत आहे. आमचे कोर्ट मॅरेज झाले. आम्ही दोघेही कायदेशीररित्या पती-पत्नी होतो. तिच्याकडे ट्यूशन फी भरण्यासाठी पैसे नव्हते, मात्र मला तिचे वागणे आवडले त्यामुळे मी तिला स्वीकारले.
जेव्हा घरात एखादा कार्यक्रम असायचा तेव्हा तमन्ना त्यात सहभागी व्हायची. मी आणि माझ्या कुटुंबाने तमन्नाचा आदर करण्याचा प्रयत्न केला. पण मला समजले नाही की तिचे तिच्या आत्याच्या मुलाशी अवैध संबंध आहेत. मला तिच्यावर संशय आल्यानंतर मी ही माहिती बाहेर समजू दिली नाही.
तिने सांगितले की बाहेर शिक्षण घ्यायचे आहे. पण तिच्या आत्याचा मुलगा दिल्लीत शिकत होता, म्हणून मी तिला दिल्लीला जाऊ दिले नाही. त्यानंतर तिने घटस्फोट मागायला सुरुवात केली. कुटुंब तुटू नये म्हणून आम्ही वेगळं राहत होतो, मात्र तरीही तिचे प्रेमसंबंध सुरूच होते असं म्हणत सोहितने जीवन संपवलं.