आशिया कप 2025 स्पर्धेची क्रिकेट चाहत्यांना उत्सकूता लागून आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकूण 8 संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये या स्पर्धेसाठी संघ जाहीर केले जाणार आहेत. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टीम जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. पीसीबीने एकूण 7 सामन्यांसाठी पाकिस्तान टीमची घोषणा केली आहे. पीसीबी आणि आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
पाकिस्तान आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीत 3 सामने खेळणार आहे. तर त्याआधी यूएई, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20i ट्राय सीरिज होणार आहे. पाकिस्तान या सीरिजमध्ये एकूण 4 सामने खेळणार आहे. पीसीबीने आशिया कप आणि ट्राय सीरिजमधील एकूण 7 सामन्यांसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. सलमान अली आगा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर मोहम्मद हारीस विकेटकीपर असणार आहे.
बाबर आणि रिझवानचा पत्ता कटपीसीबीने पाकिस्तानच्या टी 20i आणि वनडे टीममधून पत्ता कट केला आहे. पीसीबीने ट्राय सीरिज आणि आशिया कप स्पर्धा या दोन्ही मालिकांसाठी दोघांपैकी एकालाही संधी दिलेली नाही. पाकिस्तानची 8 वर्षांनंतर आशिया कप स्पर्धेत बाबर आणि रिझवान या दोघांशिवाय खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे. तसेत फखर जमां याचा समावेश करण्यात आला आहे.
ट्राय सीरिज आणि आशिया कप 2025ट्राय सीरिजमध्ये पाकिस्तान, यूएई आणि अफगाणिस्तान तिन्ही संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 2-2 अर्थात एकूण 4 सामने खेळणार आहेत. या मालिकेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. तसेच आशिया कपच्या स्पर्धेचा थरारही यूएईमध्येच रंगणार आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तिन्ही संघांसाठी ही ट्राय सीरिज अनेक दृष्टीने फायदेशीर ठरु शकते. ट्राय सीरिजचं आयोजन हे 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. त्यानंतर 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान आशिया कप स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत.
पाकिस्तानचं ट्राय सीरिजमधील वेळापत्रकविरुद्ध अफगाणिस्तान, 29 ऑगस्ट, शारजाह
विरुद्ध यूएई, 30 ऑगस्ट, शारजाह
विरुद्ध अफगाणिस्तान, 2 सप्टेंबर, शारजाह
विरुद्ध यूएई, 4 सप्टेंबर, शारजाह
पाकिस्तानचे आशिया कप स्पर्धेतील सामनेविरुद्ध ओमान, शुक्रवार, 12 सप्टेंबर
विरुद्ध टीम इंडिया, रविवार, 14 सप्टेंबर
विरुद्ध यूएई, बुधवार, 17 सप्टेंबर
ट्राय सीरिज आणि आशिया कप 2025 स्पर्धेसाठी पाकिस्तान टीम : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमां, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सॅम अय्यूब, सलमान मिर्जा, शाहीन शाह अफ्रीदी आणि सुफियान मुकिम.