कर्ज वितरण करणारी कंपनी एकावर एक शेअर देणार एकदम फ्री; लाभ घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख तपासा
ET Marathi August 18, 2025 05:45 PM
मुंबई : उषा फायनान्शियल सर्व्हिसेसने जाहीर केलेल्या बोनस इश्यूचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी आज शेवटची संधी आहे. 1:1 या प्रमाणात जाहीर झालेल्या या बोनस इश्यूसाठी सोमवार हा ‘cum-bonus’ खरेदीचा अंतिम दिवस आहे, तर 19 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.



1:1 बोनस इश्यू म्हणजे, रेकॉर्ड डेटनुसार कंपनीच्या पात्र भागधारकांना त्यांच्याकडील प्रत्येक शेअरमागे एक अतिरिक्त शेअर विनामूल्य मिळेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे यूषा फायनान्शियल सर्व्हिसेसचे 100 शेअर्स असतील, तर त्याला 100 अतिरिक्त शेअर्स मिळतील, ज्यामुळे त्याचे एकूण शेअर्स 200 होतील.



बोनस इश्यू जारी करण्याचा मुख्य उद्देश विद्यमान भागधारकांना पुरस्कृत करणे आणि बाजारात शेअर्सची तरलता वाढवणे हा असतो. बोनस इश्यूनंतर, शेअर्सची संख्या वाढल्यामुळे शेअरचा बाजारभाव प्रमाणात खाली येतो. मात्र, त्यामुळे गुंतवणूकदाराच्या एकूण गुंतवणुकीच्या मूल्यात कोणताही बदल होत नाही.



महत्त्वाच्या तारखा: शेअर्स खरेदीचा शेवटचा दिवस (कम-बोनस): सोमवार, 18 ऑगस्ट.



रेकॉर्ड डेट: मंगळवार, 19 ऑगस्ट.



एक्स-बोनस डेट: मंगळवार, 19 ऑगस्ट. (या तारखेनंतर खरेदी केलेल्या शेअर्सना बोनस मिळणार नाही.)



रेकॉर्ड डेटच्या दिवशी, कंपनी पात्र भागधारकांची त्यांच्या डिमॅट खात्यातील शेअर्सच्या आधारावर नोंद ठेवते. त्यामुळे, आज शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, रेकॉर्ड डेटपूर्वी त्यांचे व्यवहार पूर्ण झाले आहेत.



कंपनी काय काम करते? Usha Financial Services ही एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) आहे. कंपनी मुख्यतः कर्ज देण्याचं काम करते. त्यांचे व्यवसाय मॉडेल दोन भागांमध्ये विभागलेले आहेत:



एक म्हणजे किरकोळ कर्ज वितरण याअंतर्गत ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs), छोटे दुकानदार आणि वैयक्तिक उद्योजकांना कर्ज देतात. दुसरे म्हणजे होलसेल कर्ज वितरण कंपनी इतर NBFCs आणि कॉर्पोरेट कंपन्यांना कर्ज देते. ही कर्जे त्या संस्थांना त्यांच्या स्वतःच्या ग्राहकांना पुढे देण्यासाठी किंवा त्यांच्या कामकाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिली जातात
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.