सोलापूर: सोमवारी सायंकाळी संततधार सुरू असतानाही शहराच्या विविध भागातील तब्बल २२ ज्येष्ठ नागरिक संघटनांचे ४४ पदाधिकारी एका अनामिक ओढीने आपापल्या घरातून बाहेर पडले. अगदी वेळेवर ‘सकाळ’ कार्यालयात पोहोचले. कुणी शेळगी, बाळे तर कुणी नवी पेठ, होटगी रोड, जुळे सोलापूर भागातून आलेले. सर्वांनी एकमुखी निर्धार केला - ‘डीजेमुक्त सोलापूर! बुधवारी (२० ऑगस्ट) सकाळी १० वाजता सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे एकत्र यायचे आणि तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढायचा. डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायचे.’ डीजे राक्षस आहे आणि या राक्षसाला गाडायचाच, अशा शब्दांत भर पावसात एकत्र आलेल्या या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Success Story: 'सातारच्या सोहम घोलपला गुगलमध्ये ४० लाखांचे पॅकेज'; कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी, संभाषणात्मक एआय सल्लागारपदी निवड
ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती आणि शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ कार्यालयात ‘डीजेमुक्त सोलापूर’साठीच्या परिसंवादात सहभाग घेतला. यावेळी सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, शिखर समितीचे अध्यक्ष प्रा. विलास मोरे, पदाधिकारी गुरुलिंग कल्लूरकर, बाळासाहेब पाटील, राज्य समितीच्या उपाध्यक्षा मिनाक्षी पेठे, महादेव माने, अनिल कदम, कृती समितीचे सदस्य आर्कि. असिम सिंदगी, कौस्तुभ करवा यांच्यासह २२ ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
डीजेच्या मिरवणुकीनंतर अनेकांना केवळ बहिरेपण येते हे खरे आहे; पण काही तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या. डीजेच्या आवाजाने तरुणांचे मानसिक संतुलन बिघडते. ते सावरले जात नाही. हा तरुण कुटुंबातही चांगला वागत नाही. तरुणांची ही अवस्था होत असेल तर ज्येष्ठांना किती त्रास होत असेल, याचा विचार मंडळांचे पदाधिकारी करणार की नाही, असा थेट सवाल अनेक ज्येष्ठांनी विचारला.
डीजे न लावण्याच्या अटीवरच द्या देणगीडीजे लावण्यासाठी कोणीही मंडळांना आर्थिक पाठबळ देऊ नये. उलट डीजे लावणार नाही, या अटीवर प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यायला हवी. ही समाजाची समस्या आहे, ती सोडवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसमवेत प्रत्येक जागरूक नागरिकाने पुढे यायला हवे. पोलिसांना कारवाईचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण नियम २००० मध्ये तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे.
MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणी ठळक बाबी...- मोर्चा सर्व वयोगटातील महिला व नागरिकांसाठी खुला असेल
- ‘सकाळ’ व डीजेमुक्त सोलापूर कृती समितीच्या अभिनंदनाचा ठराव
- अनेक पदाधिकारी नातवांच्या मदतीने बैठकीस हजर