मुखेड (जि. नांदेड) : मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी (ता. १७) जोर धरला. नांदेड आणि बीड जिल्ह्यांच्या काही भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. लेंडी नदीला आलेल्या महापूराने मुखेड तालुक्यातील चार गावांना वेढा दिला. बचाव पथकांनी दिवसभरात सुमारे तीनशे ग्रामस्थांची पुरातून सुटका केली.
नऊ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरूच होते. म्हशींसह सुमारे सत्तर जनावरे वाहून गेली आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यात पुरात कार वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, तर तिघांना वाचविण्यात यश आले.
लोणावळ्यात पावसाची दमदार सलामीउदगीर (जि. लातूर) येथे लेंडी धरण असून त्याचे दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला. त्याशिवाय पाणलोट क्षेत्रात व नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने लेंडी नदीला मोठा पूर आला. त्यामुळे लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात असलेल्या मुखेड तालुक्यातील चार गावांना पुराचा वेढा बसला. राष्ट्रीय आपत्ती प्रतीसाद दल (एनडीआरएफ), शीघ्र कृतीदल, पोलिस आदींच्या संयुक्त पथकाने या गावांत धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
या तालुक्यातील रावणगाव येथील २२५, हासनाळमधील सहा, भिंगोली येथील ४० अशा एकूण २७१ जणांची सायंकाळी पाचपर्यंत पथकांनी सुखरूप सुटका केली. रावणगाव येथे सायंकाळपर्यंत ८० ते १०० जण पुरात अडकले होते. रावणकोळा भागातील तीन, हासनाळ येथील सहा असे नऊ जण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.
झाडावरून चढून केला बचाव
नाले, नदीला पूर आल्यामुळे मुक्रमाबाद येथून उदगीर, देगलूर, मुखेड, औराद या तालुक्याकडे जाणारी वाहतूक रात्रीपासून पूर्णपणे बंद आहे. देगलूर तालुक्यातील गवंडगाव येथील कार वाहून गेली. त्यातील एकाने झाडावर चढून आपला बचाव केला, तर दुसरा वाहून गेला. निजामाबाद येथील तीन जण वाहून गेले. त्यातील दोघांनी बचाव केला असून वाहून गेलेल्यांचा शोध सुरू असल्याचे मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी सांगितले.
Monsoon trekking safety tips: सह्याद्रीत पावसाळी भटकंती करताय? तर ‘ही’ खबरदारी घ्यायलाच हवी! नवे नियम आणि हेल्पलाइन लिहून घ्या गोशाळेतील २५ जनावरे वाहून गेलीइसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पैनगंगा नदीच्या पुराच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, किनवट, गोकुंदा, बोधडी खुर्द आदी गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. किनवट शहरातील पैनगंगा नदी किनाऱ्यावरील गोशाळेमध्ये पाणी शिरून सुमारे पंचवीस जनावरे वाहून गेली असून, काही दगावली आहेत.
‘विष्णुपुरी’प्रकल्पातून विसर्गनांदेड येथील ‘विष्णुपुरी’ प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडून २ हजार ९७० क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदापात्र दुथडी भरून वाहत आहे.
४४ म्हशी वाहून गेल्यामुक्रमाबाद (ता. मुखेड) येथील बामणी मार्गावरील बालाजी शंकरअप्पा खंकरे यांच्या मालकीची शेड, ४० दुभत्या म्हशी, वगारे वाहून गेली. देगलूर मार्गावरील मन्मथ नागनाथअप्पा खंकरे यांच्या मालकीचे शेड, चार म्हशी, वगारे यांसह दोन दुचाकी वाहून गेल्या आहेत.
कार वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू, तिघे बचावलेपरळी वैजनाथ (जि. बीड) ः कडगाव हुडा (ता. परळी वैजनाथ) शिवारातील तेलेसमुख मार्गावर असलेल्या लिंगी नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने कार वाहून गेली. रविवारी (ता. १७) मध्यरात्री ही घटना घडली. या कारमध्ये चार तरुण होते. शोधकार्यादरम्यान त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले, तर एकाचा मृतदेह आढळला. दिग्रस (ता. परळी) येथील अमर पौळ (वय २५), राहुल पौळ (३०), पुणे येथील राहुल नवले (२३) व विशाल बल्लाळ (२३) हे परळी येथील लग्न समारंभ आटोपून कोडगाव हुडामार्गे दिग्रसकडे कारने जात होते. त्यावेळी ही घटना घडली. शोधकार्यादरम्यान आज दुपारी विशाल बल्लाळ याचा मृतदेह आढळला.
Beed Flood: मुसळधार पावसाने पुलावर पाणी, मध्यरात्री पुरात चारचाकी गेली वाहून; तिघांना वाचवलं, एक जण बेपत्ता पुरात अडकलेले सात पर्यटक सुखरूपसोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) ः तालुक्यातील रुद्रेश्वर येथे पर्यटन, श्रावण सोमवारनिमित्त आलेल्या सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील सात पर्यटक वाहनासह वेताळवाडी नदीतून परत जात होते. पण ओमनी वाहन नदीच्या ऐन मध्यभागी आल्यावर पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे सर्व प्रवासी पुरात अडकले. ही गोष्ट लक्षात येताच वेताळवाडी येथील नागरिकांनी नदीच्या पाण्यात उड्या मारून पर्यटकांसह वाहनाला सुखरूप बाहेर काढले.