संगमनेर: कोणी तत्त्वासाठी किंवा विचारासाठी आम्हाला संपवू पाहत असेल, नथुराम गोडसे आमच्या पुढे आला, तरी ते बलिदान आनंदाने स्वीकारण्याची तयारी माझी आहे. महात्मा गांधी नाही, पण त्यांच्या विचारांचे बलिदान आनंदाने देण्यास मी तयार आहे, असे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
Chhava Sanghatana : 'छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा लवकर उभारा'; छावा संघटनेची मागणी, पालकमंत्री विखेंची घेतली भेटकीर्तनकार संग्रामबापू महाराज भंडारे यांनी ‘बाळासाहेब थोरात आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आज यशोधन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. थोरात म्हणाले, वारकरी संप्रदाय हा मानवतेचा व भक्तिभावाचा संदेश देणारा आहे. मात्र, काही तथाकथित महाराज अभंग व कीर्तनाऐवजी राजकारण करत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. राज्यघटनेला ठेच पोहचेल असे वक्तव्य कोणीही करू नये.
कीर्तनकारांनी भक्तिमार्ग सोडून राजकारणावर भाष्य करणे योग्य नाही. खरे कीर्तनकार या वादात पडत नाहीत. पण, काहीजण व्यासपीठावरून नथुराम गोडसे सारखी उदाहरणे देतात, ते वारकरी संप्रदायाचे असू शकत नाहीत. बंधुभावाचे राजकारण होते; मात्र आता दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील वातावरण बिघडविण्याचे काम करण्यात आले होते. आता, पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. म्हणून अशा पद्धतीने वातावरण खराब करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घ्यावी.
Ahilyanagar News: कंत्राटदार आक्रमक! 'अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे'; थकीत देयके आठ दिवसांत देण्याची मागणी, आंदोलनाचा इशाराहरिनाम सप्ताहामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन तो साजरा केला पाहिजे. मतभेद दूर केले पाहिजेत, बंधुभावाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. एकमेकांविरुद्ध लढलेल्या दोन उमेदवारांनीही एकत्र येऊन महाप्रसाद वाटला पाहिजे, या विचाराचा मी आहे. जे आज तालुक्यात उभं केलं, चांगल्या पद्धतीने घडवलं, ती संस्कृती संगमनेरची निर्माण केलेली आहे. ती आम्हाला मोडावी वाटणार नाही, आम्ही जपण्याचाच प्रयत्न केला आहे.
- बाळासाहेब थोरात, माजी मंत्री